आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने जोरात तयारी केली आहे. तेराव्या हंगामासाठी कोलकात्याने इयॉन मॉर्गन, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, एम. सिद्धार्थ, राहुल त्रिपाठी अशा प्रमुख खेळाडूंना आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे. पॅट कमिन्ससाठी कोलकात्याने १५ कोटी ५० लाखांची रेकॉर्डब्रेक बोली लावली.

मात्र आगामी हंगामासाठी कोलकात्याचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न कायम होता. अखेरीस संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रँडम मॅक्युलम यांनी याविषयी स्पष्टीकरण देत, दिनेश कार्तिकच संघाचा कर्णधार असेल असं म्हटलं आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस आयपीएलचा आगामी हंगाम सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली कोलकात्याचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader