IPL 2020 साठी १९ डिसेंबरला लिलाव प्रक्रीया पार पडली. त्यात परदेशी खेळाडू मालामाल झाले. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स याला सर्वाधिक १५ कोटी ५० लाखांच्या बोलीसह कोलकाता संघाने खरेदी केले. तो यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, तर पियुष चावला हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याला ६ कोटी ७५ लाखांच्या बोलीसह संघात सामील करून घेतले. या लिलावानंतर मूळ स्पर्धेला सुरूवात कधी होणार याबाबत चाहत्यांना खूप उत्सुकता लागली आहे. याबाबत दिल्ली कॅपिटल्स संघाचे पदाधिकारी यांनी माहिती दिली आहे.

Ranji Trophy : लाजिरवाण्या पराभवानंतर मुंबईच्या संघात बदल, ‘या’ खेळाडूला संधी

IPL 2020 ची सुरुवात येत्या २९ मार्चपासून होणार आहे. या हंगामातील सलामीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स टीम आपल्या घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला आव्हान देणार आहे, असे दिल्ली कॅपीटल्स संघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. मात्र IPL कडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

४ दिवसांचा होणार कसोटी सामना? ICC चा नवा प्रस्ताव

दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मला सांगण्यात आले आहे IPL 2020 ची सुरुवात २९ मार्चला मुंबई येथून होईल. याचा अर्थ असा की ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंचा समावेश सुरुवातीच्या काळात होणाऱ्या IPL सामन्यांमध्ये होऊ शकणार नाही. कारण या काळात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी २० मालिका असणार आहे. तर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका ३१ मार्चला संपणार आहे.

मुलगी आरती करते, म्हणून टीव्हीच फोडून टाकला – शाहिद आफ्रिदी

एका संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आधी सांगितले होते की आयपीएल गव्हर्निंग काऊन्सील पुन्हा एकदा जुन्या पद्धतीने ‘डबल हेडर’चे (एका दिवशी दोन सामने) आयोजन करणार आहे. IPL 2020 ची सुरूवात १ एप्रिलपासून होणार आहे. या हंगामात जास्तीत जास्त ‘डबल हेडर’ सामने खेळवण्याच्या विचारात आहे. असे झाल्यास प्रेक्षकांना सामने पाहायला जास्तीत जास्त चांगला वेळ मिळेल.

Story img Loader