आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. चाहते आयपीएलच्या या सत्राच्या वेळापत्रकाकडे डोळे लावून बसले आहेत. ऑरेंज आर्मी अर्थात सनरायजर्स हैदराबाद संघाने आपलं वेळापत्रक जारी केलं आहे. अधिकृत ट्विटर हँडलवर हैदराबाद संघाचे वेळापत्र प्रसारीत करण्यात आले आहे.
हैदराबाद संघाच्या १४ सामन्याचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार एक एप्रिल रोजी हैदराबाद संघाचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स संघासोबत होणार आहे. घरच्या मैदानावर तेराव्या सत्राची सुरूवात हैदराबादचा संघ करणार आहे. तर साखळी स्पर्धेतील अखेरचा सामना १५ मे रोजी कोलकाता संघासोबत इडन गार्डनवर होणार आहे. यंदाच्या सत्राची सुरूवात २९ मार्च पासून सुरु होणार असून अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत होणार आहे.
ATTENTION #OrangeArmy
The moment you’ve all been waiting for.
Mark your for #IPL2020! pic.twitter.com/Z11JPXDvwu
— SunRisers Hyderabad (@SunRisers) February 15, 2020
मार्श, प्रियम गर्ग, विराट सिंग , फॅबियन अॅलन , संदीप बावानाका, अब्दुल समाद आणि संजय यादव या खेळाडूंना सनरायजर्स हैदराबाद संघाने यंदाच्या लिलाव प्रक्रियेत करारबद्ध केलं आहे.
सनराइजर्स हैदराबादचा संघ –
केन विल्यमसन, डेविड वॉर्नर, मनीष पांडे, विराट सिंह, प्रियम गर्ग, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, बिली स्टानलेक, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, मिशेल मार्श, फॅबियन एलन, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, संजय यादव, जॉनी बेयरस्टो, ऋद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, भंवका संदीप, बासिल थंपी