चेन्नईत गुरुवारी होणाऱ्या ‘आयपीएल’च्या लिलाव प्रक्रियेत २९२ खेळाडूंचे भवितव्य ठरणार असून यापैकी कोणत्या भाग्यवान ६१ खेळाडूंना संघमालकांची पसंती मिळणार, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत स्थानिक क्रकिटपटूंकडे संघमालकासह क्रीडा प्रेमींचं लक्ष असेल. पाहूयात अशाच दहा स्थानिक क्रिकेटपटूबंद्दल, जे लिलावात कोट्यधीश होऊ शकतील….
1. मोहम्मद अजहरुद्दीन (मूळ किंमत – २० लाख) –
केरळच्या युवा सलामी आणि विस्फोटक फलंदाजानं मोहम्मद अजहरुद्दीन यानं मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ३७ चेंडूत तुफानी शतक झळकावलं होतं. या स्पर्धेतील हे दुसरं वेगवान शतक आहेत. आपल्या या विस्फोटक फलंदाजीदरम्यान अजहरुद्दीन यानं ११ षटकार आणि ९ चौकार लगावले होते. अजहरुद्दीनला विस्फोटक फलंदाजीचं बक्षीस मिळेल असं वाटतेय.
2. शाहरुख खान (मूळ किंमत – २० लाख) –
तामिळनाडूच्या या अष्टपैलू खेळाडूवर लिलावात पैशांचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या मुश्ताक अली स्पर्धेत शाहरुख खानच्या कामगिरीनं सर्वानंचं लक्ष वेधून घेतलं होतं.
3. केदार देवधर (मूळ किंमत – २० लाख) –
बडोद्याकडून खेळणारा ३१ वर्षीय केदार देवधारला यंदाच्या लिलावात पैशांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. मुश्ताक अली चषकात केदार देवधरने ८ सामन्यात ११३ च्या स्ट्राइक रेटनं ३४९ धावा चोपल्या आहेत.
4. विष्णु सोळंकी (मूळ किंमत – २० लाख) –
बडोद्याच्या या खेळाडूनं मुश्ताक अली चषकाच्या बाद फेरीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ८ सामन्यात सोळंकीनं २६७ धावा चोपल्या आहेत.
5. अवी बरोत (मूळ किंमत – २० लाख) –
गुजरातच्या या विस्फोटक फलंदाजानं मुश्कात अली चषकाच्या लीग सामन्यातील पाच डावांत ५६ च्या सरासरीनं २८३ धावांचा पाऊस पाडला होता. याचं बक्षीस त्याला आजच्या लिलावात मिळण्याची शक्यता आहे.
6. लुकमान मेरीवाला (मूळ किंमत – २० लाख) –
२९ वर्षीय वेगवान गोलंदाजानं मुश्ताक अली चषकात ८ डावांत १५ बळी घेतले आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्यामध्ये मेरीवाला दुसऱ्या क्रमांकावर आहे.
7. अतीत सेठ (मूळ किंमत – २० लाख) –
बडोद्याच्या या गोलंदाजानं या लिलावात कोट्यवधींची बोली लागण्याची शक्यता आहे. मुश्ताक अली स्पर्धेत सेठनं ८ सामन्यात ११ बळी घेतले आहेत. ३४ स्थानिक क्रिकेट सामन्यात ४६ बळी घेतले आहेत. शिवाय ७१.च्या स्ट्राइक रेटनं १५० पेक्षा जास्त धाा जमवल्या आहेत.
8. शेल्डन जॅक्सन (मूळ किंमत – २० लाख) –
३४ वर्षीय शेल्डन जॅक्सन यानं मुश्ताक अली चषकात पाच सामन्यात २४२ धावा चोपल्या आहेत. या स्पर्धेत त्यानं एक शतकी खेळीही केली आहे. जॅक्सनला २०१२ मध्ये कोलकाता संघानं करारबद्ध केलं होतं. त्यानंतर २०१३ मध्ये त्याला आरसीबीनं आपल्या चमूत सामील केलं होतं.
9. जलज सक्सेना (मूळ किंमत – २० लाख) –
या ३४ वर्षीय अष्टपैलू खेळाडूनं याआधी आयपीएलमध्ये मुंबई आणि आरसीबी संघाचं प्रतिनिधित्व केलं आहेत. नुकत्याच झालेल्या मुश्ताक अली चषकामध्ये त्यानं ५ सामन्यत १० विकेट घेतल्या आहेत. स्थानिक ५९ सामन्यात ६६१ धावा आणि ५९ बळी मिळवले आहेत.
10. अर्जुन तेंडुलकर (मूळ किंमत – २० लाख) –
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यानं आयपीएल लिलावासाठी आपली नोंदणी केली आहे. मुश्ताक अली चषकात त्यानं नुकतचं पदार्पण केलं आहे. गेल्या आठवड्याच MIG क्रिकेट क्लबकडून खएळताना ३१ चेंडूत नाबाद ७७ धावांची खेळी केली होती. शिवाय गोलंदाजीत तीन बळीही मिळवले होते. २१ वर्षीय या अष्टपैलू खेळाडूला घेण्यासाठी मुंबईसोबतच चेन्नई आणि आरसीबीमध्ये स्पर्धा असू शकते.