इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १४ व्या पर्वातील खेळाडूंचा लिलाव आज पार पडत आहे. या लिलावामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनेही नावनोंदणी केली आहे. मात्र पहिल्या सत्रातील लिलावानंतरही अर्जुनवर बोली लावण्यात आली. २० लाख रुपये त्याची मूळ किंमत म्हणजेच बेस प्राइज असणाऱ्या अर्जुनवर कोण बोली लावणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे. मात्र बोली लागण्याआधीपासूनच अर्जुन तेंडुलकर सोशल नेटवर्कींगवर खास करुन ट्विटरवर चर्चेत आहे. विशेष म्हणजे अर्जुनसोबत आणखीन एक ट्रेण्डींग आहे ते म्हणजे सचिन बेबी या खेळाडूचे. सर्वात मजेदार बाब म्हणजे हे दोन्ही खेळाडू वेगळे आहेत असं अनेकांना सांगावं लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नक्की वाचा >> IPL Auction : केदार जाधववर बोलीच लागली नाही; CSK च्या चाहत्यांनी मानले देवाचे आभार

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवर बोली लावलेली नसतानाच सचिन बेबीला मात्र आरसीबीने २० लाखांना विकत घेतलं. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आल्यानंतर Sachin Baby आणि Arjun Tendulkar ही दोन्ही नावं ट्रेण्डमध्ये आली आहेत. ही दोन्ही नावं दोन वेगळ्या व्यक्तींची आहेत अर्जुनचा उल्लेख आयपीएलच्या अकाऊंटवरुन सचिन बेबी असा करण्यात आलेला नाही असं अनेकांनी पोस्ट केलं आहे.

नक्की वाचा >> IPL Auction : अर्जुनला CSK ने विकत घेतलं तर…; लिलावाआधीच Arjun Tendulkar टॉप ट्रेण्डमध्ये

अनेकांनी हे दोन वेगळे खेळाडू असल्याची आठवण नेटकऱ्यांना करुन दिलीय. तर काहींनी आरसीबीने घाईघाईत अर्जुन तेंडुलकर समजून सचिन बेबीला विकत घेतल्याचं म्हटलं आहे. पाहुयात काही मजेदार मिम्स…

१) जेव्हा तुम्हाला कळतं की…

२) जेव्हा आरसीबीला कळलं

३) लय गोंधळ आहे

४) हे कधी झालं

५) दोघे वेगळे आहेत रे

६) काय टुकार व्यवस्था आहे

७) वेगळीच अडचण आहे

८) समजून घ्या

९) दोन वेगळेत का?

१०) अपुन चांद पे है

११) ठीक आहे

१२) हे असे दिसतात

सचिन बेबी हा अर्जुनच्या आधी बोली लावत आरसीबीने संघात घेतला असला तरी अर्जुनवर लावण्यात येणाऱ्या बोलीवर सर्वांचेच लक्ष आहे. अर्जुनने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्येच पोलीस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली होती. अर्जुनने एकाच षटकात ५ षटकार लगावत ३१ चेंडूत ७७ केल्या. तसेच तीन महत्वाचे बळीही मिळवले आहेत.