मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या रवींद्र जडेजाने खळबळ उडवून दिली आहे. यंदाच्या लीगमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या हर्षल पटेलची जडेजाने चांगलीच धुलाई केली. शून्यावर जीवदान लाभलेल्या जडेजाने २०व्या षटकात ३७ धावा कुटल्या.
There are 6666264 reasons for why we love Jadeja! #CSKvRCB #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/nDn9ZQGjCS
— Chennai Super Kings – Mask podu Whistle Pdu! (@ChennaiIPL) April 25, 2021
या सामन्यात जडेजाने २८ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांसह नाबाद ६२ धावांची खेळी केली. बंगळुरूचा गोलंदाज हर्षल पटेलने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकणाऱ्या प्रशांत परमेश्वरनशी बरोबरी साधली. यापूर्वी बंगळुरूकडून खेळणाऱ्या ख्रिस गेलने पुणे वॉरियर्सच्या परमेश्वरनला एका षटकात ३७ धावा कुटल्या होत्या.
A finish in style by JADDU!#CSKvRCB #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/9UASNZx8LS
— Chennai Super Kings – Mask Whistle Pdu! (@ChennaiIPL) April 25, 2021
चेन्नईचे बंगळुरूला १९२ धावांचे आव्हान
रवींद्र जडेजाच्या वादळी खेळीमुळे चेन्नईने बंगळुरुसमोर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नईने ४ गडी गमवून १९१ धावा केल्या. त्यात फाफ आणि जडेजाचे अर्धशतक समाविष्ट आहे. जडेजा शून्यावर असताना बंगळुरूच्या डॅनियल ख्रिश्चनने त्याचा झेल सोडला होता. सामन्यात तीन गडी मिळवूनही हर्षल पटेल हतबल झाल्याचे दिसून आले.