मुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सवर 18 धावांनी विजय मिळवत आपला विजयी प्रवास सुरू ठेवला आहे. कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली. मात्र, त्याचा हा निर्णय फसला. चेन्नईने कोलकातासमोर 20 षटकात 3 बाद 220 धावा उभारल्या. चेन्नईचे सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी आक्रमक फलंदाजी करत कोलकाताच्या गोलंदाजांना नामोहरम केले. प्रत्युत्तरात कोलकाताने पहिल्या पॉवरप्लेमध्ये आपले अर्धे फलंदाज गमावले, त्यानंतर आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक आणि पॅट कमिन्सने वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. कोलकाताचा डाव 202 धावांवर संपुष्टात आला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. चेन्नईचा सलामीवीर फाफ डु प्लेसिसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा