आयपीएल २०२१ स्पर्धेत प्लेऑफच्या सामन्यात चेन्नईने दिल्लीला ४ गडी आणि २ चेंडू राखून पराभूत केलं. या विजयासह चेन्नईने अंतिम फेरीत धडक मारली आहे. दिल्लीने चेन्नईसमोर विजयसाठी १७३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान चेन्नईने ६ गडी गमवत १९ षटकं आणि ४ चेंडूत पूर्ण केलं. या विजयासह चेन्नईने आयपीएल इतिहासात नवव्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. आतापर्यंत चेन्नईने आयपीएलचे ३ चषक आपल्या नावावर केले आहेत.

या सामन्यात शेवटच्या दोन षटकात कोण बाजी मारेल?, अशी स्थिती असताना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बॅट चांगलीच तळपली. धोनीने ३०० च्या स्ट्राईक रेटने म्हणजेच ६ चेंडूत १८ धावा केल्या. या खेळी ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या षटकात ३ चौकार ठोकत दिल्लीला ४ गडी आणि २ चेंडू राखून मात दिली. मोक्याच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे धोनीने चेन्नईला अंतिम फेरीत पोहोचवले. विशेष म्हणजे धोनीने त्याच्या स्टाईलमध्ये फिनिशिंग टच देत विजयी चौकार मारला.

आयपीएलमधील चेन्नईचा आतापर्यंतचा प्रवास

  • २००८- चेन्नई सुपर किंग्स- अंतिम फेरीत पराभूत
  • २०१०- चेन्नई सुपर किंग्स- विजयी
  • २०११- चेन्नई सुपर किंग्स- विजयी
  • २०१२- चेन्नई सुपर किंग्स- अंतिम फेरीत पराभूत
  • २०१३- चेन्नई सुपर किंग्स- अंतिम फेरीत पराभूत
  • २०१५- चेन्नई सुपर किंग्स- अंतिम फेरीत पराभूत
  • २०१८- चेन्नई सुपर किंग्स- विजयी
  • २०१९- चेन्नई सुपर किंग्स- अंतिम फेरीत पराभूत
  • २०२१- अंतिम फेरीत

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेझलवूड

दिल्ली कॅपिटल्स – ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, टॉम करन, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, आवेश खान, एनरिक नॉर्किया.

Story img Loader