आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफची लढत रंगतदार वळणावर आली आहे. चेन्नई आणि दिल्ली हे दोन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरू संघाचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे चौथ्या संघासाठी कोलकाता, पंजाब, राजस्थान आणि मुंबईत चुरस निर्माण झाली आहे. या चार संघांचं प्लेऑफमधील स्थान जर तर वर अवलंबून आहे. त्यात राजस्थानने चेन्नईला ७ गडी आणि १५ चेंडू राखून पराभूत केल्याने मुंबईचा प्लेऑफमधील प्रवास खडतर झाला आहे.

चेन्नईच्या पराभवानंतर मुंबईकर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर चेन्नईच्या कामगिरीवर टीका केली आहे. तर काही चाहत्यांनी मुंबईला अडचणीत आणण्यासाठी जाणीवपूर्वक हारल्याची शंका व्यक्त केली आहे.

गुणतालिकेत १८ गुणांसह चेन्नईचा संघ अव्वल स्थानी आहे. दिल्लीचा संघ १८ गुणांसह दुसऱ्या, बंगळुरूचा संघ १४ गुणांसह तिसऱ्या, कोलकाताच्या संघ १० गुणांसह चौथ्या, पंजाबचा संघ १० गुणांसह पाचव्या, राजस्थानचा संघ १० गुणांसह सहाव्या, तर मुंबईचा संघ १० गुणांसह सातव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर तळाशी असलेल्या हैदराबादचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलं आहे.

Story img Loader