आयपीएलवर करोनाचं संकट असल्याने सर्वच खेळाडू आणि व्यवस्थापक बायो बबलमध्ये आहेत. अशात खेळाडुंना कुठेही जाता येत नाही कुणालाही भेटता येत नाही. त्यामुळे खेळाडू अशा वातावरणातही मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी नवनवे प्रयोग करत असतात. नुकताच चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडुंचा जेवण बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सुरैश रैना आणि अंबाती रायडू यांच्यासोबत चेन्नईचे खेळाडू जेवण बनवताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला पहिल्याच सामन्यात दिल्लीकडून पराभवाची चव चाखावी लागली. असं असलं तरी चेन्नई खेळाडू पराभव विसरुन स्वत: बनवलेल्या बिर्याणीची चव चाखत आहेत. चेन्नई सुपर किंग्सने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात खेळाडू किचनमध्ये जेवण बनवताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये सुरेश रैना आणि अंबाती रायडू बिर्याणी बनवताना दिसत आहेत. रैनाला जेवण बनवण्याची आवड आहे असंच या व्हिडिओतून दिसतंय. तर बिर्याणी व्यवस्थित शिजली आहे की, नाही याचा अंदाज रायडू चव चाखून घेताना दिसतोय. या दोघांव्यतिरिक्त इतर खेळाडूही किचन घाम गाळताना दिसत आहेत. जेवण तयार झाल्यानंतर खेळाडुंनी या जेवणाचा एकत्र आनंदही लुटला. व्हिडिओत स्टीफन फ्लेमिंग, माइक हसी आणि शार्दुल ठाकुर हॉटेलच्या स्विमिंग पूलजवळ ब्रेकफास्ट करताना दिसत आहे. मात्र अडीच मिनिटांच्या व्हिडिओत कर्णधार महेंद्रसिंह धोनी कुठेही दिसत नाही.

हैदराबादच्या पराभवासाठी वॉर्नरने ‘यांना’ धरलं जबाबदार

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईला पराभूत केले. या सामन्यात रैनाने ५४ धावांची खेळी केली. तर मोइल अलीने ३६ धावा केल्या. तर कर्णधार धोनीला खातंही खोलता आलं नाही आणि आयपीएलच्या कारकिर्दीत चौथ्यांदा शून्यावर बाद झाला. दिल्लीकडून पराभूत झाल्यानंतर चेन्नईचा दूसरा सामना पंजाबसोबत १६ एप्रिलला आहे.