आयपीएल २०२१ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. चेन्नई, दिल्लीनंतर बंगळुरूने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. तिन्ही संघांनी प्रत्येकी १२ सामने खेळले असून साखळी सामन्यातील औपचारिक दोन सामने खेळायचे आहेत. असं असलं तरी चेन्नई आणि बंगळुरूचं दिल्लीच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. तिन्ही संघांची टॉप २ मध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. कारण टॉप २ मध्ये असलेल्या संघांना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतात.
चेन्नई आणि दिल्लीने १२ सामन्यात प्रत्येकी १८ गुण मिळवले आहेत. मात्र धावगतीच्या आधारावर चेन्नईचा संघ टॉपवर आहे. चेन्नईला अजूनही दिल्ली आणि पंजाब किंग्ससोबत सामना खेळायचा आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचं टॉपमधलं स्थान निश्चित होणार आहे. दुसरीकडे दिल्लीचा दुसरा सामना बंगळुरुसोबत आहे. त्यामुळे विराटसेनेही दिल्ली पराभूत करत टॉपमध्ये राहण्याचा प्रयत्न करणार आहे. बंगळुरूचे १२ सामन्यात १६ गुण आहेत. मात्र दिल्ली आणि सनराइजर्स हैदराबाद पराभूत करत टॉपमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. दोन्ही सामने बंगळुरूने जिंकल्यास टॉपमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र बंगळुरूची धावगती दोन्ही संघांच्या तुलनेत कमी आहे.
- दिल्ली विरुद्ध चेन्नई (४ ऑक्टोबर २०२१, वेळ- संध्याकाळी ७.३० वाजता)
- बंगळुरु विरुद्ध हैदराबाद ( ६ ऑक्टोबर, वेळ- संध्याकाळी ७.३० वाजता)
- चेन्नई विरुद्ध पंजाब ( ७ ऑक्टोबर, वेळ- दुपारी ३.३० वाजता)
- बंगळुरू विरुद्ध दिल्ली ( ८ ऑक्टोबर, वेळ- संध्याकाळी ७.३० वाजता)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स अद्याप एकही आयपीएल किताब जिंकलेली नाही. तर चेन्नईचा संघ ३ वेळा किताब जिंकली.