वानखेडेवर रंगलेल्या आयपीएलच्या बाराव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर 45 धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली. नाणेफेक गमावलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना सुरेश रैना, फाफ डु प्लेसिस आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या योगदानाच्या जोरावर 20 षटकात 9 बाद 188 धावा केल्या. चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून जोस बटलर (49) वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली. 20 षटकात राजस्थानला 9 बाद 143 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांनी दमदार गोलंदाजी करत राजस्थानचे कंबरडे मोडले. राजस्थानचा हा लीगमधील दुसरा पराभव ठरला. विशेष म्हणजे, चेन्नईचा कर्णधार म्हणून धोनीचा हा 200वा सामना होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजस्थानचा डाव

चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मनन वोहरा आणि जोस बटलर यांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. 30 धावांची भागीदारी केल्यानंतर सॅम करनने वोहराला बाद केले. जडेजाने वोहराचा झेल घेतला. दुसऱ्या बाजूने बटलरने आपली आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात करनने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला (1) माघारी धाडले. पॉवरप्लेमध्ये राजस्थानने 2 बाद 45 धावा केल्या. बटलरने शिवम दुबेसह भागीदारी करत 10 षटकात 2 बाद 81 धावा उभारल्या. जडेजाने 12व्या षटकात गोलंदाजीला येत बटलरला अर्धशतकापासून वंचित ठेवले. बचाव करताना वळलेला चेंडू बटलरची दांडी घेऊन गेला.  बटलरने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 49 धावा जोडल्या. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जडेजाने शिवम दुबेला पायचित पकडत राजस्थानला अजून संकटात टाकले. त्यानंतर पुढच्याच षटकात मोईन अलीने डेव्हिड मिलरला पायचित पकडले.

15व्या षटकात मोईन अलीने रियान पराग (3) आणि ख्रिस मॉरिसला (0) पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. राहुल तेवतिया आणि जयदेव उनाडकट यांनी फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. 20 षटकात राजस्थानला 9 बाद 143 धावांपर्यंतच मजल मारता आली.

चेन्नईचा डाव

ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी चेन्नईच्या डावाची सुरुवात केली. राजस्थानचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर ऋतुराजचा अवघड झेल राहुल तेवतियाने सोडला. मात्र, या जीवदानाचा ऋतुराजला फायदा उचलता आला नाही. चौथ्या षटकात मुस्तफिजुरने त्याला वैयक्तिक 10 धावांवर झेलबाद केले. शिवम दुबेने त्याचा झेल घेतला. त्यानंतर डु प्लेसिसने आक्रमक होत उनाडकटच्या तिसऱ्या षटकात 19 धावा वसूल केल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात ख्रिस मॉरिसने डु प्लेसिसला बाद केले. डु प्लेसिसने 17 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 33 धावा केल्या. पहिल्या 6 षटकात चेन्नईने 2 बाद 46 धावा उभारल्या. त्यानंतर मोईन अलीने थोडी फटकेबाजी केली, मात्र, 10व्या षटकात त्याला राहुल तेवतियाने बाद केले. अलीने 26 धावांचे योगदान दिले.

सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांनी चेन्नईला शंभरीपार नेले. या दोघांनी संघासाठी 45 धावांची भागीदारी उभारली. 14व्या षटकात चेतन साकारियाने रायुडू आणि रैनाला बाद केले. रैनाने 18 तर रायुडूने 27 धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या धोनीकडून मोठ्या  खेळीची अपेक्षा होती. मात्र, 18 धावा काढून तो माघारी परतला. साकारियाचा तो तिसरा बळी ठरला. धोनीनंतर जडेजाही स्वस्तात बाद झाला. शेवटच्या काही चेंडूंमध्ये ब्राव्होने उपयुक्त धावा जोडल्या. राजस्थानकडून साकारियाने 3, मॉरिसने 2 तर, मुस्तफिजुर आणि तेवतिया यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

प्लेईंग XI

चेन्नई – ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, सॅम करन, एमएस धोनी, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर.

राजस्थान – मनन वोहरा, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन साकारिया, मुस्तफिजुर रहमान