आयपीएल २०२१च्या स्पर्धेत दिल्लीनं पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली. धोनीच्या चेन्नईला मात देत पहिला विजय मिळवला. या सामन्यात आघाडीला आलेल्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दमदार खेळी केली. चेन्नईच्या गोलंदाजांना अक्षरश: घाम फोडला. पृथ्वी शॉने ३८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. या खेळीत ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या खेळीचं प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगनं तोंडभरुन कौतुक केलं. या कौतुकाचा व्हिडिओ दिल्लीनं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर शेअर केला आहे. मात्र पृथ्वी शॉचा हट्ट पुरवण्यास विसरले नाहीत.
चेन्नईला पराभूत केल्यानंतर पृथ्वीने मुलाखतीत रिकी पॉन्टिंगचं मार्गदर्शनाबाबत भाष्य केलं होतं. रिकी पॉन्टिंग जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा शाहरूख खानच्या ‘चक दे इंडिया’ चित्रपटाचं गाणं बॅकग्राउंडला वाजल्याचा फिल येतो. त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे दिल्लीचा संघ आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे, असं पृथ्वीने सांगितलं होतं.
पृथ्वीचं म्हणणं दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापनानं चांगलंच मनावर घेतलं. रिकी पॉन्टिंगचा मार्गदर्शन करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमागे चक दे इंडिया चित्रपटाचं बॅकग्राउंड संगीत वाजत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
The video you’ve been waiting for is here @RickyPonting‘s first dressing room speech after a scintillating win against #CSK is giving us all the feels#YehHaiNayiDilli #IPL2021 pic.twitter.com/pkh9gISRuI
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 14, 2021
‘पृथ्वी शॉ चांगली कामगिरी करतोय. मात्र प्रत्येक खेळीतून काहीतरी नवं शिकावं लागेल. पुढचा सामन्यावर लक्ष्य केंद्रीत करुन अधिक धावा करायच्या आहेत.’ असं रिकी पॉन्टिंग या व्हिडिओत सांगताना दिसत आहे.
Video: चिडलेल्या कोहलीने बॅटने उडवली खुर्ची, IPL च्या आचारसंहितेचा भंग; मॅच रेफ्रींनी फटकारलं
दिल्लीचा सामना राजस्थानसोबत आहे. राजस्थानला पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी राजस्थानची धडपड असणार आहे.