फाफ डु प्लेसिसचे दमदार अर्धशतक, शार्दुल ठाकूरचा भेदक मारा आणि रवींद्र जडेजाची क्षेत्ररक्षणासोबत उपयुक्त गोलंदाजी यामुळे चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला २७ धावांनी धूळ चारत आयपीएलचे चौथे विजेतेपद नावावर केले. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या महामुकाबल्यात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने अनुभवाचा पुरेपूर वापर करत महत्त्वाच्या क्षणी सामन्याला कलाटणी दिली. नाणेफेक गमावलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना कोलकातासमोर २० षटकात ३ बाद १९२ धावा केल्या. सलामीवीर फाफ डु प्लेसिसने तडाखेबंद ८६ धावांची खेळी केली. त्याला ऋतुराज, उथप्पा आणि मोईन अलीची योग्य साथ मिळाली. प्रत्युत्तरात कोलकाताचे सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी ९१ धावांची दमदार सलामी दिली. पण मधल्या फळीत फलंदाजांनी घेतलेल्या दबावामुळे कोलकाता आपल्या तिसऱ्या जेतेपदापासून लांब राहिली. त्यांना २० षटकात ९ बाद १६५ धावांपर्यंतच पोहोचता आले. डु प्लेसिसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोलकाताचा डाव
व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी कोलकातासाठी दमदार सुरुवात केली. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी संघासाठी ५५ धावा उभारल्या. १०व्या षटकात अय्यरने ३१ चेंडूत आपले अर्धशतक फलकावर लावले. याच षटकात कोलकाताला पहिला धक्का बसला असता. जडेजाने शुबमनला रायुडूकरवी झेलबाद केले. पण, शुबमनने मारलेला चेंडू स्पायडर कॅमेऱ्याला बसल्यामुळे तो चेंडू डेड ठरवण्यात आला. १० षटकात कोलकाताने बिनबाद ८८धावा केल्या. ११व्या षटकात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. त्याने अर्धशतकवीर अय्यरला माघारी पाठवले. रवींद्र जडेजाने त्याचा अप्रतिम झेल टिपला. अय्यरने ३२ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा केल्या. अय्यरनंतर मैदानात आलेल्या नितीश राणाला शार्दुलने भोपळाही फोडू दिला नाही. राणानंतर सुनील नरिन, दिनेश कार्तिक आणि ईऑन मॉर्गन यांना मोठी खेळी करता आली नाही. अर्धशतक ठोकलेल्या शुबमनला दीपक चहरने पायचीत पकडत चेन्नईला चौथे यश मिळवून दिले. . शुबमनने ६ चौकारांसह ५१ धावा केल्या. या पडझडीनंतर मात्र चेन्नईने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. कोलकात्याला २० षटकात ९ बाद १६५ धावांपर्यंतच पोहोचला आले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने तीन, जोश हेझलवुड आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
हेही वाचा – T20 WC: ‘‘पाकिस्तान का खेळतोय?, तुम्ही आम्हाला…”; हरभजननं शोएब अख्तरची काढली कळ!
चेन्नईचा डाव
ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी चेन्नईसाठी चांगली सलामी दिली. कोलकाताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला डु प्लेसिसला तिसऱ्या षटकात यष्टीचीत करण्याची संधी होती, पण त्याने ती गमावली. डु प्लेसिसने या जीवदानाचा फायदा उचलला. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये चेन्नईचे अर्धशतक फलकावर लावले. नवव्या षटकात फिरकीपटू सुनील नरिनने कोलकाताला पहिले यश मिळवून दिले. त्याने ऋतुराजला वैयक्तिक ३२ धावांवर झेलबाद केले. ऋतुराजनंतर रॉबिन उथप्पाने फटकेबाजी केली. ११व्या षटकात डु प्लेसिनने वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला अप्रतिम षटकार ठोकत आपले पाचवे अर्धशतक फलकावर लावले. आक्रमक उथप्पाला सुनील नरिनने पायचित पकडले. उथप्पाने १५ चेंडूत ३ षटकारांसह ३१ धावा केल्या. उथप्पानंतर मैदानात आलेल्या मोईन अलीने फटकेबाजी केली. डु प्लेसिसने आधी उथप्पासोबत त्यानंतर मोईन अलीसोबत अर्धशतकी भागीदारी उभारली. २०व्या षटकात मावीने फक्त ७ धावा दिल्याने चेन्नईला दोनशे धावाचे अंतर पार करता आले नाही. शेवटच्या चेंडूवर डु प्लेसिस झेलबाद झाला. त्याने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ८६ धावा केल्या. तर मोईन अली २ चौकार आणि ३ षटकारांसह ३७ धावांवर नाबाद राहिला. २० षटकात चेन्नईने ३ बाद १९२ धावा फलकावर लावल्या.
चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला २० षटकात ९ बाद १६५ धावांपर्यंतच पोहोचता आले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने तीन, जोश हेझलवुड आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
CHENNAI SUPER KINGS — CHAMPIONS, AGAIN 💪
— Cricbuzz (@cricbuzz) October 15, 2021
🏆 2010
🏆 2011
🏆 2018
🏆 2021 #IPL2021 #CSKvKKR #CSK pic.twitter.com/Js1rAtCvEL
१८ षटकात कोलकाताने ८ बाद १४५ धावा केल्या. विजयासाठी त्यांना १२ चेंडूत ४८ धावांची गरज आहे.
दबावात आलेला कोलकाताचा कप्तान ईऑन मॉर्गनही १७व्या षटकात झेलबाद झाला आणि चेन्नईने विजेतेपदाकडे पाऊल टाकले.
शार्दुलने पुन्हा गोलंदाजीसाठी येत चेन्नईला मोठे यश मिळवून दिले. १६व्या षटकात त्याने फॉर्मात असेलेल्या त्रिपाठीला बाद केले.
कोलकाताच्या क्षेत्ररक्षणाच्या वेळी संघाचा अनुभवी फलंदाज राहुल त्रिपाठी दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो फलंदाजीसाठी त्याच्या नियमित स्थानी आला नाही. पण कोलकाताची घसरगुंडी उडाल्यानंतर आणि शाकिब माघारी परतल्यानंतर राहुल फलंदाजीसाठी आला आहे. १६ षटकात कोलकाताने ७ बाद १२५ धावा केल्या.
अपेक्षित धावा आणि शिल्लक चेंडू यांचे वाढते अंतर पाहता कार्तिकने जडेजाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. ९ धावांचे योगदान देऊन तो झेलबाद झाला. याच षटकात जडेजाने शाकिब अल हसनला शून्यावर पायचीत पकडले. १५ षटकात कोलकाताने ६ बाद १२० धावा केल्या. त्यांना विजयासाठी आता ३० चेंडूत ७३ धावांची गरज आहे.
Jadeja gets his second as he finishes his four over spell 🔥
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 15, 2021
Shakib is out for a GOLDEN DUCK! #CSKvKKR | #IPLFinal
अर्धशतक ठोकलेल्या शुबमनला दीपक चहरने पायचीत पकडत चेन्नईला चौथे यश मिळवून दिले. . शुबमनने ६ चौकारांसह ५१ धावा केल्या. १४ षटकात कोलकाताने ४ बाद ११७ धावा केल्या.
१३व्या षटकात शुबमनने जडेजाला चौकार खेचत आपले १०वे अर्धशतक पूर्ण केले.
Keep holding the fort, @ShubmanGill! #KKR #CSKvKKR #AmiKKR #IPL2021 #IPLFinal pic.twitter.com/b8HurvsaNr
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 15, 2021
शार्दुलनंतर जोश हेझलवूडने चेन्नईला तिसरे यश मिळवून दिले. जडेजाने मोठा फटका खेळू पाहणाऱ्या नरिनचा सीमारेषेवर सुंदर झेल टिपला. नरिननंतर कप्तान ईऑन मॉर्गन मैदानात आला आहे. १२ षटकात कोलकाताने ३ बाद ९९ धावा केल्या.
Hazlewood gets Narine and KKR are three down! #CSKvKKR | #IPLFinal

अय्यरनंतर मैदानात आलेल्या नितीश राणाला शार्दुलने भोपळाही फोडू दिला नाही. ११ षटकात कोलकाताने २ बाद ९३ धावा केल्या. राणानंतर सुनील नरिन मैदानात आला आहे.
☝️ Iyer

☝️ Rana
It's that man again! Shardul Thakur gets two in an over 🔥#CSKvKKR | #IPLFinal
११व्या षटकात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. त्याने अर्धशतकवीर अय्यरला माघारी पाठवले. रवींद्र जडेजाने त्याचा अप्रतिम झेल टिपला. अय्यरने ३२ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा केल्या.
१०व्या षटकात व्यंकटेश अय्यरने ३१ चेंडूत आपले अर्धशतक फलकावर लावले. याच षटकात कोलकाताला पहिला धक्का बसला असता. जडेजाने शुबमनला रायुडूकरवी झेलबाद केले. पण, शुबमनने मारलेला चेंडू स्पायडर कॅमेऱ्याला बसल्यामुळे तो चेंडू डेड ठरवण्यात आला. १० षटकात कोलकाताने बिनबाद ८८धावा केल्या.
८ षटकात कोलकाताने बिनबाद ६८ धावा केल्या. आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अय्यरने जडेजाला षटकार खेचला.
पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये गिल-अय्यरने संघासाठी ५५ धावा उभारल्या.
Cracking start in the chase for @KKRiders! 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) October 15, 2021
@ivenkyiyer2512 & @ShubmanGill complete a brisk half-century stand as #KKR move to 55/0 after 6 overs. 👍 👍#VIVOIPL | #CSKvKKR | #Final
Follow the match 👉 https://t.co/JOEYUSwYSt pic.twitter.com/lThH40qLmx
चौथ्या षटकात कोलकाताचा दुसरा सलामीवीर शुबमन गिलला हेझलवुडच्याच गोलंदाजीवर जीवदान मिळाले. शार्दुल ठाकूरकडून गिलचा अवघड झेल सुटला. ४ षटकात कोलकाताने बिनबाद ३६ धावा केल्या.
दुसऱ्याच षटकात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीनं वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर फॉर्मात असलेल्या अय्यरचा यष्टीपाठी सोपा झेल सोडला. २ षटकात कोलकाताने बिनबाद १५ धावा केल्या.
Dropped by MS Dhoni. 👀👀#CSKvKKR #IPL2021Final pic.twitter.com/SEJ09nXpDU
— Wisden India (@WisdenIndia) October 15, 2021
व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी कोलकातासाठी सलामी दिली. तर वेगवान गोलंदाज दीपर चहरने चेन्नईसाठी पहिले षटक टाकले.
२०व्या षटकात मावीने फक्त ७ धावा दिल्याने चेन्नईला दोनशे धावाचे अंतर पार करता आले नाही. शेवटच्या चेंडूवर डु प्लेसिस झेलबाद झाला. त्याने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ८६ धावा केल्या. तर मोईन अली २ चौकार आणि ३ षटकारांसह ३७ धावांवर नाबाद राहिला. २० षटकात चेन्नईने ३ बाद १९२ धावा फलकावर लावल्या.
CSK have finished with 192/3
— Cricbuzz (@cricbuzz) October 15, 2021
Faf du Plessis 86 (59) #IPLFinal pic.twitter.com/JLrRn5rMM0
उथप्पानंतर मैदानात आलेल्या मोईन अलीने फटकेबाजी केली. १८ षटकात चेन्नईने २ बाद १७२ धावा केल्या.
१६ षटकात चेन्नईने २ बाद १३९ धावा फलकावर लावल्या. उथप्पा बाद झाल्यानंतर चेन्नईची धावगती मंदावली.
ऋतुराजनंतर आलेल्या उथप्पाने आक्रमक अंदाजात फलंदाजी केली. मात्र १४व्या षटकात नरिनने त्याला पायचित पकडले. उथप्पाने १५ चेंडूत ३ षटकारांसह ३१ धावा केल्या. उथप्पानंतर मोईन अली मैदानात आला आहे. १४ षटकात चेन्नईने २ बाद १२५ धावा केल्या.
Runs – 31

Balls – 15
Sixes – 3
Strike Rate – 206.6
Robin Uthappa departs after playing a sizzling cameo.#IPLFinal #CSKvKKR #IPL2021Final pic.twitter.com/RHQ6gqkgko
१२ षटकात चेन्नईने १ बाद १०४ धावा केल्या. पुढच्याच षटकात डु प्लेसिस आणि उथप्पाने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.
११व्या षटकात डु प्लेसिनने वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला अप्रतिम षटकार ठोकत आपले पाचवे अर्धशतक फलकावर लावले. ११ षटकात चेन्नईने १ बाद ९७ धावा केल्या.
१० षटकात चेन्नईने १ बाद ८० धावा केल्या.
नवव्या षटकात फिरकीपटू सुनील नरिनने कोलकाताला पहिले यश मिळवून दिले. त्याने ऋतुराजला वैयक्तिक ३२ धावांवर झेलबाद केले. ऋतुराजनंतर रॉबिन उथप्पा मैदानात आला आहे. ऋतुराज-डु प्लेसिस यांनी पहिल्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी केली. ९ षटकात चेन्नईने १ बाद ६५ धावा केल्या.
चेन्नईने ८ षटकात बिनबाद ६१ धावा फलकावर लावल्या आहेत.
ऋतुराज-डुप्लेसिस यांनी पॉवरप्लेमध्ये चेन्नईचे अर्धशतक फलकावर लावले. ६ षटकात चेन्नईने बिनबाद ५० धावा केल्या.
Solid start to the proceedings for @ChennaiIPL in the #VIVOIPL #Final! 👏 👏@Ruutu1331 & @faf1307 complete a 5⃣0⃣-run partnership as powerplay comes to an end. 👍 👍 #CSKvKKR

Follow the match 👉 https://t.co/JOEYUSwYSt pic.twitter.com/Iuery3Tbvt
कोलकाताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला डु प्लेसिसला तिसऱ्या षटकात यष्टीचीत करण्याची संधी होती, पण त्याने ती गमावली. ३ षटकात चेन्नईने बिनबाद २२ धावा केल्या.
ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस हे चेन्नईचे सलामीवीर मैदानात आले आहेत.फिरकीपटू शाकिब अल हसन कोलकातासाठी पहिले षटक टाकत आहे.