फाफ डु प्लेसिसचे दमदार अर्धशतक, शार्दुल ठाकूरचा भेदक मारा आणि रवींद्र जडेजाची क्षेत्ररक्षणासोबत उपयुक्त गोलंदाजी यामुळे चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला २७ धावांनी धूळ चारत आयपीएलचे चौथे विजेतेपद नावावर केले. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या महामुकाबल्यात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने अनुभवाचा पुरेपूर वापर करत महत्त्वाच्या क्षणी सामन्याला कलाटणी दिली. नाणेफेक गमावलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना कोलकातासमोर २० षटकात ३ बाद १९२ धावा केल्या. सलामीवीर फाफ डु प्लेसिसने तडाखेबंद ८६ धावांची खेळी केली. त्याला ऋतुराज, उथप्पा आणि मोईन अलीची योग्य साथ मिळाली. प्रत्युत्तरात कोलकाताचे सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी ९१ धावांची दमदार सलामी दिली. पण मधल्या फळीत फलंदाजांनी घेतलेल्या दबावामुळे कोलकाता आपल्या तिसऱ्या जेतेपदापासून लांब राहिली. त्यांना २० षटकात ९ बाद १६५ धावांपर्यंतच पोहोचता आले. डु प्लेसिसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोलकाताचा डाव

व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी कोलकातासाठी दमदार सुरुवात केली. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी संघासाठी ५५ धावा उभारल्या. १०व्या षटकात अय्यरने ३१ चेंडूत आपले अर्धशतक फलकावर लावले. याच षटकात कोलकाताला पहिला धक्का बसला असता. जडेजाने शुबमनला रायुडूकरवी झेलबाद केले. पण, शुबमनने मारलेला चेंडू स्पायडर कॅमेऱ्याला बसल्यामुळे तो चेंडू डेड ठरवण्यात आला. १० षटकात कोलकाताने बिनबाद ८८धावा केल्या. ११व्या षटकात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. त्याने अर्धशतकवीर अय्यरला माघारी पाठवले. रवींद्र जडेजाने त्याचा अप्रतिम झेल टिपला. अय्यरने ३२ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा केल्या. अय्यरनंतर मैदानात आलेल्या नितीश राणाला शार्दुलने भोपळाही फोडू दिला नाही. राणानंतर सुनील नरिन, दिनेश कार्तिक आणि ईऑन मॉर्गन यांना मोठी खेळी करता आली नाही. अर्धशतक ठोकलेल्या शुबमनला दीपक चहरने पायचीत पकडत चेन्नईला चौथे यश मिळवून दिले. . शुबमनने ६ चौकारांसह ५१ धावा केल्या. या पडझडीनंतर मात्र चेन्नईने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. कोलकात्याला २० षटकात ९ बाद १६५ धावांपर्यंतच पोहोचला आले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने तीन, जोश हेझलवुड आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

हेही वाचा – T20 WC: ‘‘पाकिस्तान का खेळतोय?, तुम्ही आम्हाला…”; हरभजननं शोएब अख्तरची काढली कळ!

चेन्नईचा डाव

ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी चेन्नईसाठी चांगली सलामी दिली. कोलकाताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला डु प्लेसिसला तिसऱ्या षटकात यष्टीचीत करण्याची संधी होती, पण त्याने ती गमावली. डु प्लेसिसने या जीवदानाचा फायदा उचलला. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये चेन्नईचे अर्धशतक फलकावर लावले. नवव्या षटकात फिरकीपटू सुनील नरिनने कोलकाताला पहिले यश मिळवून दिले. त्याने ऋतुराजला वैयक्तिक ३२ धावांवर झेलबाद केले. ऋतुराजनंतर रॉबिन उथप्पाने फटकेबाजी केली. ११व्या षटकात डु प्लेसिनने वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला अप्रतिम षटकार ठोकत आपले पाचवे अर्धशतक फलकावर लावले. आक्रमक उथप्पाला सुनील नरिनने पायचित पकडले. उथप्पाने १५ चेंडूत ३ षटकारांसह ३१ धावा केल्या. उथप्पानंतर मैदानात आलेल्या मोईन अलीने फटकेबाजी केली. डु प्लेसिसने आधी उथप्पासोबत त्यानंतर मोईन अलीसोबत अर्धशतकी भागीदारी उभारली. २०व्या षटकात मावीने फक्त ७ धावा दिल्याने चेन्नईला दोनशे धावाचे अंतर पार करता आले नाही. शेवटच्या चेंडूवर डु प्लेसिस झेलबाद झाला. त्याने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ८६ धावा केल्या. तर मोईन अली २ चौकार आणि ३ षटकारांसह ३७ धावांवर नाबाद राहिला. २० षटकात चेन्नईने ३ बाद १९२ धावा फलकावर लावल्या.

Live Updates
19:06 (IST) 15 Oct 2021
धोनीचं त्रिशतक

चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीचा कर्णधार म्हणून हा ३०० वा टी-२० सामना आहे.

19:04 (IST) 15 Oct 2021
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंह धोनी (कप्तान आणि यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेजलवूड.

कोलकाता नाइट रायडर्स – ईऑन मॉर्गन (कप्तान ), शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुनील नरिन, शाकिब अल हसन, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

19:02 (IST) 15 Oct 2021
मॉर्गननं जिंकला टॉस

कोलकाताचा कप्तान ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

18:05 (IST) 15 Oct 2021
धोनी विरुद्ध मॉर्गन

धोनी विरुद्ध मॉर्गन

18:01 (IST) 15 Oct 2021
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स – ईऑन मॉर्गन (कप्तान ), शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुनील नरिन, शाकिब अल हसन/आंद्रे रसेल, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

18:00 (IST) 15 Oct 2021
हेड-टू-हेड

आयपीएलमध्ये दोन्ही संघांदरम्यान खेळलेल्या एकूण २६ सामन्यांमध्ये चेन्नईचे वर्चस्व आहे. त्यांनी १६ सामने जिंकले, तर कोलकाताचा संघ ९ वेळा जिंकण्यात यशस्वी ठरला. गेल्या ६ सामन्यांमध्येही चेन्नईचे वर्चस्व राहिले आहे. तर चेन्नईला पाच तर कोलकाताला फक्त एका सामन्यात विजय मिळाला.

17:59 (IST) 15 Oct 2021
यंदाच्या हंगामात चेन्नई वरचढ

चालू हंगामात चेन्नई आणि कोलकाता दोनदा भिडले आहेत. यादरम्यान चेन्नईचा संघ दोन्ही सामने जिंकण्यात यशस्वी ठरला. सीएसकेने केकेआरला भारतात खेळलेल्या पहिल्या लेगमध्ये १८ धावांनी आणि यूएई लेगमध्ये २ विकेटने पराभूत केले.