दुबई : फॅफ डय़ूप्लेसिसच्या (८६) उत्कृष्ट फलंदाजीनंतर मुंबईकर शार्दूल ठाकूरने (३/३८) केलेल्या भेदक माऱ्यामुळे चेन्नई सुपर किंग्जने अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला २७ धावांनी धूळ चारत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १४व्या हंगामाचे जेतेपद पटकावले. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईचे हे चौथे ‘आयपीएल’ जेतेपद ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने दिलेल्या १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला २० षटकांत ९ बाद १६५ धावाच करता आल्या. दोन वेळा विजेत्या कोलकाताची ‘आयपीएल’चा अंतिम सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ होती. यंदा उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वेंकटेश अय्यर (५०) आणि शुभमन गिल (५१) या युवा सलामीवीरांनी आक्रमक शैलीत फलंदाजी केली. परंतु शार्दूलने सलग दोन चेंडूंत अय्यर आणि नितीश राणा यांना बाद केले. तसेच दीपक चहरने गिलला पायचीत केले. त्यामुळे बिनबाद ९१ अशा धडाकेबाज प्रारंभानंतर कोलकाताने २४ धावांत आठ बळी गमावले आणि त्यांच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.

तत्पूर्वी, ‘एलिमिनेटर’ आणि ‘क्वालिफायर-२’च्या सामन्यात धावांचा यशस्वीरीत्या पाठलाग करणाऱ्या कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारल्यावर चेन्नईने २० षटकांत ३ बाद १९२ अशी धावसंख्या उभारली. फॅफ (८६) आणि ऋतुराज गायकवाड (३२) यांनी चेन्नईला चांगली सुरुवात मिळवून दिली. त्यांनी आठ षटकांत ६१ धावांची भागीदारी रचल्यावर फिरकीपटू सुनील नरिनने ऋतुराजला माघारी पाठवले. मग फॅफला रॉबिन उथप्पाची (३१) उत्तम साथ लाभली. उथप्पाने शाकिब अल हसन, वरुण चक्रवर्ती आणि नरिन या फिरकी त्रिकुटाच्या गोलंदाजीवर प्रत्येकी एक षटकार मारला. मात्र, नरिनच्या गोलंदाजीवर ‘रीव्हर्स स्वीप’ मारण्याच्या नादात तो पायचीत झाला. फॅफ आणि मोईन अली (नाबाद ३७) यांनी अखेरच्या पाच षटकांत फटकेबाजी करत ६१ धावा काढल्याने चेन्नईने १९० धावांचा टप्पा ओलांडला. फॅफने ५९ चेंडूत ८६ धावांची खेळी करताना सात चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी केली.

ऋतुराजमध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत यशस्वी होण्याची क्षमता -वेंगसरकर

दुबई : चेन्नई सुपर किंग्जकडून ‘आयपीएल’मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या ऋतुराज गायकवाडमध्ये कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत यशस्वी होण्यासाठी आवश्यक क्षमता असून भारतीय निवड समितीने त्याला संधी दिली पाहिजे, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. ‘‘ऋतुराजमध्ये कोणत्याही परिस्थितीत खेळण्याची क्षमता असून तो मानसिकदृष्टय़ा कणखर आहे. तो चांगली कामगिरी करत असल्याने त्याला आताच संधी लाभल्यास त्याच्यासाठी आणि भारतीय संघासाठी ते फायदेशीर ठरेल. निवड समितीला एखाद्या खेळाडूच्या गुणवत्ते आणि मानसिकतेबाबत खात्री असल्यास त्यांनी त्वरित त्याला राष्ट्रीय संघात स्थान दिले पाहिजे,’’ असे वेंगसरकर यांनी सांगितले. वेंगसरकर यांच्या पुणे येथील अकादमीतून ऋतुराजने क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.

धोनीचा त्रिशतकी विक्रम!

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कोलकाताविरुद्धच्या अंतिम सामन्यात अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून धोनीचा हा ३००वा सामना होता आणि ही कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील पहिलाच खेळाडू ठरला. धोनीने चेन्नईचे २१४ सामन्यांत नेतृत्व केले असून त्याने एका ‘आयपीएल’ हंगामाच्या १४ सामन्यांत रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे कर्णधारपद भूषवले होते. तसेच त्याने भारताचा कर्णधार म्हणून ७२ सामने खेळले. त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ साली झालेला पहिलावहिला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. 

ऑरेंज कॅप

(सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज)

फलंदाज                       धावा

१. ऋतुराज गायकवाड (चेन्नई) ६३५

२. फॅफ डय़ूप्लेसिस (चेन्नई)   ६३३

३. के. एल. राहुल (पंजाब)    ६२६

४. शिखर धवन (दिल्ली)     ५८७

५. ग्लेन मॅक्सवेल (बेंगळूरु)   ५१३

पर्पल कॅप

(सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज)

गोलंदाज              बळी

१. हर्षल पटेल (बेंगळूरु)      ३२

२. आवेश खान (दिल्ली)      २४

३. जसप्रीत बुमरा (मुंबई) २१ 

४. शार्दूल ठाकूर (चेन्नई) २१

५. मोहम्मद शमी (पंजाब) १९

संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ३ बाद १९२ (फॅफ डय़ूप्लेसिस ८६, मोईन अली नाबाद ३७, ऋतुराज गायकवाड ३२; सुनील नरिन २/२६) विजयी वि. कोलकाता नाइट रायडर्स २० षटकांत ९ बाद १६५ (शुभमन गिल ५१, वेंकटेश अय्यर ५०; शार्दूल ठाकूर ३/३८, जोश हेझलवूड २/२९)