आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती घेतली असली, तरी त्याच्या कर्णधारपदामध्ये जुनी धार दिसते. दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध रोमांचक क्वालिफायर सामन्यात धोनीने चेन्नईला विजय मिळवून दिला. यंदाचा हंगाम फलंकाजीच्या दृष्टीने धोनीसाठी वाईट ठरला. त्याच्याबाबत अनेकांनी प्रतिक्रिया दिला. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही अनेकदा धोनीला टोले लगावले आहेत, पण आज होणाऱ्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने धोनीला सर्वोत्तम म्हटले.

ईएसपीएनक्रिकइन्फोवर गंभीर म्हणाला, ”धोनी आणि मॉर्गनच्या फॉर्मची तुलना करणे स्वतःच चुकीचे आहे. कारण धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि दुसरा खेळाडू त्याच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. आपण सफरचंदांची तुलना संत्र्यांशी करू नये. धोनी इतके दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही आणि जर तो फॉर्ममध्ये नसेल किंवा कमी योगदान देत असेल तर ते मान्य आहे. पण दुसरीकडे मॉर्गन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. तरीही, जर तुम्ही दोघांच्या फलंदाजीची तुलना केली तर आयपीएल २०२१ मध्ये धोनीची कामगिरी मॉर्गनपेक्षा खूप चांगली आहे.”

हेही वाचा – IPL 2021 Final : चेन्नई वि. कोलकाता; कधी, कुठे, कसा आणि केव्हा पाहता येणार सामना?

गंभीर म्हणाला, ”धोनी तीन गोष्टी करतो (नेतृत्व, फलंदाजी आणि यष्टीरक्षण) त्याच वेळी, मॉर्गन फक्त दोन जबाबदाऱ्या पार पाडतो, कर्णधारपद आणि फलंदाजी. यापैकी एकामध्ये त्याची कामगिरी पूर्णपणे खराब झाली आहे. तर कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून धोनीने या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे दोघांच्या स्वरूपाची तुलना करणे योग्य होणार नाही.

धोनीने आयपीएल २०२१ मध्ये आतापर्यंत १५ सामन्यांमध्ये १६ च्या सरासरीने ११४ धावा केल्या आहेत. त्याने या मोसमात केवळ १२ चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. धोनीने या मोसमात यष्टीरक्षक म्हणून १३ झेल घेतले आहेत. फलंदाज म्हणून धोनीची ही सर्वात वाईट कामगिरी आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये २०० धावा केल्या होत्या.

Story img Loader