आयपीएल २०२१ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात रंगतदार वळणावर आली आहे. स्पर्धेत आतापर्यंत प्लेऑफसाठी चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ पात्र ठरले आहेत. सनराइजर्स हैदराबाद या संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाइटराइडर्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स या संघांना प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यात अजूनही यश आलेलं नाही. बंगळुरूने एक सामना जिंकल्यास त्यांचं प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार आहे. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाइटराइडर्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स या चार संघांमध्ये चुरस असणार आहे. या चार संघांचे गुणतालिकेत प्रत्येकी १० गुण आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू– विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत मालिकेत ११ सामने खेळले आहेत. यातील ७ सामन्यात विजय तर ४ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावलं लागलं आहे. बंगळुरूचे अजूनही तीन सामने उरले आहेत. यापैकी एका सामन्यात विजय मिळाल्यास प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार आहे. बंगळुरूच्या खात्यात सध्या १४ गुण जमा आहेत. पंजाब, सनराइजर्स, हैदराबाद आणि दिल्ली यांच्यासोबत सामने आहेत.
  • कोलकाता नाइटराइडर्स- कोलकात्याचं संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असून एकूण १० गुण आहेत. कोलकाताचे अजूनही दोन सामने उरले आहेत. सनराइजर्स हैदराबाद आणि राजस्थानसोबत सामने होणार आहेत. हे दोन्ही सामने जिंकल्यास कोलकात्याचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. त्याचबरोबर कोलकात्याची धावगतीही चांगली आहे +०.३०२ इतकी आहे. एक सामना गमवल्यास इतर संघांच्या कामगिरीवर भवितव्य अवलंबून असेल. मात्र हैदराबादकडून पराभव झाल्यास तारेवरची कसरत असणार आहे.
  • पंजाब किंग्स- पंजाब संघाच्या खात्यात १० गुण असून गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. पंजाबचे स्पर्धेत दोन सामने बाकी आहेत. बंगळुरू आणि चेन्नई अशा तगड्या संघासोबत त्यांना लढत द्यायची आहे. हे दोन्ही सामने जिंकल्यास पंजाबला प्लेऑफमध्ये संधी मिळणार आहे. मात्र कोलकात्याच्या कामगिरीवर चौथं स्थान निश्चित होईल. यापैकी एकही सामना गमावल्यास पंजाबचा संघ स्पर्धेबाहेर जाईल.
  • राजस्थान रॉयल्स- आयपीएल स्पर्धेतील पहिला किताब राजस्थानने जिंकला होता. त्यानंतर संघाची कामगिरी हवी तशी झाली नाही. या स्पर्धेत राजस्थाननं १२ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ७ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. चेन्नईला पराभूत करत राजस्थानचा गुणतालिकेत राजस्थानचा संघ सहाव्या स्थानावर आहे. उर्वरित दोन सामने जिंकूनही त्यांना इतर संघांच्या कामगिरी अवलंबून राहावं लागणार आहे. राजस्थानची धावगती -०.३३७ इतकी आहे. राजस्थानचे पुढील दोन सामने मुंबई आणि कोलकात्यासोबत आहेत.
  • मुंबई इंडियन्स- मुंबईनं पाच वेळा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला आहे. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरी झालेली नाही. आतापर्यंत खेळलेल्या १२ पैकी ५ सामन्यात विजय, तर ७ सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे. यासह गुणतालिकेत मुंबईचा संघ सातव्या स्थानावर आहे. मुंबईचा नेट रनरेट उणे ०.४५३ आहे. मुंबईचे पुढचे दोन सामने राजस्थान रॉयल्स आणि सनराइजर्स हैदराबाद सोबत आहे. दोन्ही सामने जिंकत इतर संघाच्या कामगिरीवर प्लेऑफचं स्थान अवलंबून आहे. कोलकाता, पंजाब आणि राजस्थाननं सामना गमवल्यास संधी मिळण्याची शक्यता आहे.

हैदराबाद संघाचं आव्हान संपुष्टात आलं असलं तरी उलटफेर करण्याची ताकद आहे.