अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ मधील जबरदस्त प्रवास संपुष्टात आला. कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) शारजाह येथे एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (आरसीबी) ४ गडी राखून पराभव केला. मॅक्सवेल या सामन्यात मोठी खेळी खेळू शकला नाही. गोलंदाजीत त्याने २५ दिल्या. दुसरीकडे, केकेआरच्या सुनील नरिनने गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल केली.

सामन्यानंतर, लोकांनी सोशल मीडियावर आरसीबी आणि त्याच्या खेळाडूंबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कप्तान म्हणून शेवटचा सामना खेळलेल्या विराट कोहलीसाठीही अनेक शुभेच्छापर संदेश व्हायरल झाले. यासोबतच ट्विटरवर RoyalFixerChallengers आणि haarcb हे शब्दही ट्रेंड झाले.

हेही वाचा – IPL 2021 : “नशीबवान खेळाडू खेळवायचा होता तर…”, सेहवागची RCBवर बोचरी टीका!

सामन्याच्या काही तासांनंतर, मॅक्सवेलने त्यांच्या समर्थनाबद्दल चाहत्यांचे आभार मानले, परंतु अपमानास्पद ट्रोल्सवर देखील हल्ला चढवला. मॅक्सवेलने ट्विटरवर लिहिले, ”आरसीबीचा विलक्षण हंगाम, दुर्दैवाने, आम्ही जिथे असायला हवे होते त्यापासून थोडे दूर आहो. सोशल मीडियावर वाहणारा कचरा घृणास्पद आहे! आम्ही मानव आहोत जे दररोज आपले सर्वोत्तम देत आहेत. गैरवर्तन पसरवण्याऐवजी, एक सभ्य व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. खऱ्या चाहत्यांचे आभार, ज्यांनी त्या खेळाडूंसाठी प्रेम आणि आपले सर्वस्व दिले! दुर्दैवाने तेथे काही वाईट लोक आहेत, जे सोशल मीडियाला एक भयानक ठिकाण बनवतात. हे अस्वीकार्य आहे !!!! कृपया त्यांच्यासारखे होऊ नका !!!”

मॅक्सवेल पुढे म्हणाला, ”जर तुम्ही माझ्या टीममधील कोणत्याही मित्र/मैत्रिणीवर सोशल मीडियावर नकारात्मक/अपमानास्पद मूर्खपणासह टिप्पणी केली, तर तुम्हाला सर्वांनी ब्लॉक केले जाईल. वाईट व्यक्ती असण्याचा काय अर्थ होतो? कोणतेही निमित्त नाही.”

ग्लेन मॅक्सवेल आयपीएल २०२१ मध्ये त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने १५ सामन्यांमध्ये ४२.७५च्या सरासरीने ५१३ धावा केल्या. त्याने संपूर्ण स्पर्धेत संघासाठी १६ षटके टाकली आणि १३५ धावा देऊन ३ बळी घेतले.

Story img Loader