मुंबई इंडियन्सचा तरुण फलंदाज इशान किशनने आयपीएल २०२१ च्या शेवटच्या साखळी सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबादविरुद्ध शुक्रवारी ८४ धावांची धमाकेदार खेळी केली. अवघ्या ३२ चेंडूंमध्ये इशानने ८४ धावा केल्या. या खेळीमुळे मुंबईने हैदराबादला ४२ धावांनी पराभूत केलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाने ९ गड्यांच्या मोबदल्यात १२० चेंडूंमध्ये २३५ धावा केल्या. पाच वेळा विजेतापद जिंकणाऱ्या मुंबईला प्लेऑफचं तिकीट निश्चित करण्यासाठी सनरायझर्सला ६६ धावांच्या आत रोखणं आवश्यक होतं. मात्र तसं झालं नाही सनरायझर्सने ८ गड्यांच्या मोबदल्यात १९३ धावा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईने सामना जिंकला मात्र नेट रनरेटच्या जोरावर कोलकात्याने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं. या सामन्यामध्ये इशान किशनला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर बोलताना इशानने टी २० विश्वचषकासंदर्भात भाष्य करताना आपण या स्पर्धेत सलामीवीर म्हणून भारतीय संघाकडून फलंदाजी करणार आहोत असं सांगितलं. विशेष म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेच आपल्याला ही माहिती दिल्याचं इशान म्हणाला.

याच महिन्यामध्ये सुरु होणाऱ्या टी २० विश्वचषकासाठी १५ सदस्यांचा समावेश असणारा भारतीय संघ निवडण्यात आलाय. यामध्ये ऋषभ पंत आणि इशान किशन या दोन यष्टीरक्षकांचा समावेश आहे. मात्र इशानने आपल्याला संघामध्ये सलामीचा फलंदाज म्हणून निवडण्यात आलं असल्याचं विराटने सांगितल्याचं म्हटलं आहे. तसेच सलामीवीर म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार राहा असंही विराटने म्हटल्याचं इशानने स्पष्ट केलं.
“टी २० विश्वचषकाच्या आधी चांगली कामगिरी करण्यासाठी ही खेळी फार महत्वाची ठरली. मी माझ्या संघासाठी काही धावा केल्या. आजचा खेळ फारच सकारात्मक होता. आम्हाला जवळजवळ २५०-२६० पर्यंत पोहचायचं होतं. त्याच हिशोबाने मी खेळी केली,” असं इशान म्हणाला.

“मला सलामीला फलंदाजीला यायला आवडेल आणि हेच मला विराटने आम्ही केलेल्या चर्चेदरम्यान सांगितलं. तुला एक सलामीवीर म्हणून निवडण्यात आलं आहे. तुला फक्त त्यासाठी तयार राहायचं आहे, असं विराट मला म्हणाला. मला वाटतं एवढ्या मोठ्या स्तरावर खेळताना तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये खेळण्यासाठी तयार राहता आलं पाहिजे,” असं इशान म्हणाला. टी २० विश्वचषक स्पर्धा १७ ऑक्टोबरपासून सुरु होता आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती म्हणजे युएई आणि ओमानमध्ये होणार आहे.

“प्रत्येक परिस्थितीसाठी तुम्हाला या स्पर्धेमध्ये तयार असावं लागणार आहे. योग्य मानसिकता असणंही फार महत्वाचं आहे. खेळाडू म्हणून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठीच मैदानात उतरणं गरजेचं आहे. विराटसोबत मी सविस्तर चर्चा केलीय. जसप्रीत बुमराहनेही मला मदत केली. सर्वांनीच मला पाठिंबा दिला आणि हे तुझं शिकण्याचं वय आहे असं सांगितलं. आयपीएलमधील सामन्यांमधून शिकून घ्यायचं आणि त्या चुका टी २० विश्वचषकाच्या दरम्यान टाळायच्या याकडे लक्ष देण्याचा सल्ला मला अनेक वरिष्ठ खेळाडूंनी दिलाय. आजची खेळी अशीच शिकवण देणारी ठरली,” असं इशान म्हणाला.

२३ वर्षीय इशानने हैदराबादविरोधात खेळताना ३२ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि चार षटकार लगावले. १६ चेंडूंमध्ये त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. याशिवाय सूर्यकुमार यादवनेही सुरेख फलंदाजी केली. त्याने ४० चेंडूंमध्ये १३ चौकार आणि तीन षटकार लगावत ८२ धावांची खेळी केली. मुंबईने या सामन्यात आपली सर्वात मोठी धावसंख्या उभारली. मात्र प्लेऑफचं स्वप्न त्यांना पूर्ण करता आलं नाही.