भारतीय स्टार क्रिकेटर हार्दिक पंड्या आता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२१) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसतील. आयपीएलच्या १४व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दोन्ही क्रिकेटपटू अबुधाबी येथील संघाच्या शिबिरात सामील झाले आहेत.

हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एका आलिशान कारमध्ये हॉटेलमध्ये पोहोचतो. त्यानंतर हार्दिक आणि कृणाल यांना व्हिडिओमध्येच हॉटेलच्या आत जाताना दाखवले आहे. आयपीएलचा १४वा हंगाम यावर्षी मे मध्ये करोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे पुढे ढकलण्यात आला होता. तो आता १९ सप्टेंबरपासून पुन्हा रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दुबईत होणाऱ्या सामन्याने या टप्प्याची पुन्हा सुरवात होईल.

 

हेही वाचा – VIDEO : इंग्लिश चाहत्यांना एकटा भिडला भारताचा मोहम्मद सिराज, ‘असे’ उत्तर देऊन बोलती केली बंद!

मुंबई इंडियन्सचे अनेक खेळाडू आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघ (CSK) या महिन्याच्या सुरुवातीला यूएईला पोहोचले. त्यांनी प्रशिक्षणही सुरू केले आहे. १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना अबुधाबीमध्ये खेळला जाईल. २४ सप्टेंबर रोजी शारजाहमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज सामन्याचे यजमानपद भूषवतील. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात दुबईत १३, शारजाहमध्ये १० आणि अबुधाबीमध्ये एकूण ८ सामने खेळले जातील.