आयपीएल स्पर्धेतील पाच जेतेपदांचा नायक असलेला मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या हंगामातून जवळपास बाहेर पडला आहे. निराशाजनक प्रदर्शनामुळे मुंबईला यंदा आपला प्रवास प्लेऑफच्या आधीच थांबवावा लागण्याची शक्यता आहे. मुंबईच्या या परिस्थितीवर पाकिस्तानचा माजी कप्तान सलमान बटने भाष्य केले. मुंबईचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडला, ही चांगली गोष्ट असल्याचे मत बटने दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्या यूट्यूब चॅनेलवरील संभाषणादरम्यान सलमान बट म्हणाला, ”ही चांगली गोष्ट आहे, की मुंबई प्लेऑफमधून बाहेर पडली आहे. कारण जेव्हा ते शेवटून जिंकण्यास सुरुवात करतात, तेव्हा ते बहुतेक वेळा जेतेपद पटकावतात. आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स सारख्या नवीन संघांनी जेतेपद पटकावले तर चांगले होईल. मुंबई इंडियन्स हा अतिशय धोकादायक संघ आहे.”

हेही वाचा – अबब..! भारताच्या पहिल्या वर्ल्डकप ट्रॉफीला मिळाली ‘इतकी’ किंमत!

मुंबई इंडियन्स सध्या १३ सामन्यांत सहा विजयांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. कारण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना अपेक्षित निव्वळ धावगती गाठणे कठीण आहे, क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाही पण तसे क्वचितच होते. आज मुंबईचा सामना सनरायझर्स हैदराबादशी आहे. बाद फेरीत जाण्यासाठी आणि निव्वळ धावगती वाढवण्यासाठी मुंबईला १७१ पेक्षा जास्त धावांनी पराभूत करावे लागेल.

पण नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी घेतली, तर मुंबई त्याच वेळी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.