कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२१च्या ४९ व्या सामन्यात एक रंजक घटना घडली. केकेआरचा फलंदाज नितीश राणाने मारलेल्या एका चौकारामुळे ब्रॉडकास्ट कॅमे़रा फुटला आहे. त्याचा या चौकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

सामन्याच्या १७व्या षटकात राणाने जेसन होल्डरला चौकार मारला. चेंडू सीमा ओलांडून थेट ब्रॉडकास्ट कॅमे़रावर आदळला. त्यामुळे लेन्स फुटली. यानंतर तिथे उभा असलेला हैदराबादचा खेळाडू राशिद खान कॅमेरा तपासताना दिसला.

हेही वाचा – IPL 2021: “थर्ड अम्पायरची हकालपट्टी करा,” बंगळुरु आणि पंजाबमधील सामन्यातील ‘त्या’ निर्णयामुळे न्यूझीलंडचा खेळाडू संतापला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राशिदची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, राणा पुढच्याच चेंडूवर बाद झाला. त्याने ३३ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. कोलकाच्याचा सलामीवीर शुबमन गिल या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने अर्धशतक ठोकले. त्याने ५१ चेंडूत ५७ धावा केल्या. गिलच्या शानदार डावाच्या जोरावर केकेआरने हैदराबादने दिलेले ११९ धावांचे लक्ष्य १९.४ षटकांत ४ गडी गमावून साध्य केले.