मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर सामना खेळवला गेला. या रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर १० धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या या हंगामात पहिल्या विजयाची नोंद केली, तर दुसरीकडे कोलकाताचा पराभव झाल्याने त्यांच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. या पराभवानंतर कोलकाताचा मालक असलेल्या शाहरुख खानने चाहत्यांची माफी मागितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सला १५३ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरूवात चांगली झाली. मात्र मधली फळी ढेपाळल्याने मुंबईने १० धावांनी विजय मिळवला. तर कोलकाता नाईट रायडर्सच्या चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. या पराभवानंतर कोलकाता संघाचा मालक असलेल्या शाहरुख खानने ट्विट करून चाहत्यांची माफी मागितली.

सामना संपल्यानंतर शाहरुख खानने ट्विट केलं आहे. ‘कमी शब्दात म्हणायचं तर निराशाजनक कामगिरी. कोलकाता नाईट रायडर्सच्या सर्व चाहत्यांची माफी,’ असं शाहरुख खानने म्हटलं आहे.

कोलकाताने मुंबई इंडियन्सला १५३ धावांवर सर्वबाद केलं. रसेलनं १८ व्या षटकात गोलंदाजीला येत २ षटकात १५ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरूवात चांगली झाली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे कोलकाताने १० धावांनी सामना गमावला. मुंबईकडून राहुल चहरने ४ बळी घेतले.