आयपीएल २०२१ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या सामना रंगला. या सामन्यात राजस्थानच्या २१ वर्षीय महिपाल लोमरोर याची बॅट चांगलीच तळपलळी. त्याने १७ चेंडूवर ४३ धावा केल्या. या ४ षटकार आणि २ चौकारांचा समावेश आहे. त्याच्या आक्रमक खेळीने पंजाबच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. मात्र अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर फटका मारताना फॅबियन अ‍ॅलनने त्याचा झेल घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवला. महिपालने १७ चेंडूत २५२.९४ च्या सरारीने ४३ धावा केल्या.

महिपालने २०१८ मध्ये आयपीएल स्पर्धेत खेळण्यास सुरुवात केली होती. आयपीएल कारकिर्दीत महिपाल आतापर्यंत ८ सामने खेळला आहे. २०१८ मध्ये २ सामने, २०१९ मध्ये २ सामने, २०२० मध्ये ३ आणि आताच्या आयपीएलमध्ये त्याचा पहिला सामना आहे. भारताच्या अंडर १९ संघात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याची निवड आयपीएलमध्ये करण्यात आली.

पंजाबवर राजस्थान रॉयल्सचा वरचष्मा

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा संघ खेळत आहे. आयपीएलच्या इतिहासात एकूण २२ वेळा पंजाब आणि राजस्थान आमनेसामने आले आहेत. यात पंजाबने १० वेळा तर राजस्थानने १२ वेळा विजय मिळवला आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अटीतटीच्या सामन्यात पंजाबने राजस्थानला मात दिली होती.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

पंजाब किंग्ज – केएल राहुल (कप्तान आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, एडन मार्कराम, निकोलस पूरन, दीपक हुडा, हरप्रीत ब्रार, आदिल रशीद, इशान पोरेल, फॅबियन एलन, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी.

राजस्थान रॉयल्स – एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कप्तान आणि यष्टीरक्षक), रियान पराग, महिपाल लोमरोर, लियाम लिव्हिंगस्टोन, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, चेतन साकारिया, कार्तिक त्यागी आणि मुस्तफिजूर रेहमान.