आयपीएल २०२१ स्पर्धेत हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या इशान किशननं तुफान फटकेबाजी केली. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी मोठी धावसंख्या उभारण्याचं मुंबईपुढे आव्हान असल्याने सुरूवातीपासूनच इशाननं आक्रमक खेळी केली. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबईला हैदराबादवर १७१ धावांनी चमत्कारिक विजय मिळवावा लागणार आहे, तरच ते निव्वळ धावगतीच्या जोरावर प्लेऑफसाठी पात्र ठरतील. इशाननं आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक झळकावलं आहे. १६ चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीत ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. इशान किशन ३२ चेंडूत ८४ धावा करून बाद झाला. या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. उमरान मलिकच्या गोलंदाजीवर वृद्धिमान साहाने त्याचा झेल घेतला.

आयपीएल २०२१ स्पर्धेत जलद अर्धशतक झळकावणारे खेळाडू

  • इशान किशन (मुंबई विरुद्ध हैदराबाद) १६ चेंडूत ५० धावा
  • किरोन पोलार्ड (मुंबई विरुद्ध चेन्नई) १७ चेंडूत ५० धावा
  • पृथ्वी शॉ (दिल्ली विरुद्ध कोलकाता)१८ चेंडूत ५० धावा
  • यशस्वी जैस्वाल (राजस्थान विरुद्ध चेन्नई) १९ चेंडूत ५० धावा
  • मनिष पांडे (हैदराबाद विरुद्ध चेन्नई) ३५ चेंडूत ५० धावा

मुंबईची प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, जेम्स नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, ट्रेंट बोल्ट


Story img Loader