मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यानंतर कृणालला चाहत्यांच्या रोषाला सोमोरे जावे लागले. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएल २०२१ च्या ४६ व्या सामन्यात मुंबईचा संघ दिल्लीकडून चार गडी राखून पराभूत झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईच्या उर्वरित फलंदाजांप्रमाणेच कृणाल देखील चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. तो १५ चेंडू खेळून १३ धावांवर नाबाद राहिला. मुंबईने २० षटकांत एकूण १२९ धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीत त्याने २.१ षटकांत १८ धावां दिल्या आणि एक विकेट घेतली. दिल्लीला शेवटच्या षटकात विजयासाठी ४ धावा असताना अश्विनने कृणालला षटकार खेचला. त्या षटकारानंतर कृणालवर टीकाही करण्यात आली.

कृणालने या हंगामात १२ सामन्यांमध्ये १४.८८च्या सरासरीने एकूण १३४ धावा केल्या आहेत. त्याने ७.७४च्या इकॉनॉमी रेटने आतापर्यंत फक्त पाच विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – IPL 2021 : CSKच्या गोलंदाजांची धुलाई केलेल्या ‘मुंबई’कराला धोनीनं दिलं खास गिफ्ट!

दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर, गतविजेता मुंबई संघ पाच विजय आणि सात पराभवांसह सातव्या स्थानावर आहे. त्यांचे प्लेऑफपर्यंत पोहोचण्याचे गणितही बिघडले आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना मंगळवारी शारजाहमध्ये राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.