आज शनिवारी चेन्नईच्या कठीण खेळपट्टीवर मुंबई इंडियन्स आणि सनराजझर्स हैदराबाद हे दोन संघ एकमेकांसमोर उभे असणार आहे. एका बाजूला रोहित शर्मा तर दुसऱ्या बाजूला डेव्हिड वॉर्नर असे दोन तडाखेबंद कर्णधार आयपीएलच्या नवव्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. आरसीबीसीकडून पहिल्या सामन्यात मात खाल्ल्यानंतर मुंबईने याच खेळपट्टीवर कोलकाताला 10 धावांनी हरवत विजयारंभ केला. तर, हैदराबादने आत्तापर्यंतचे दोन्ही सामने गमावले आहेत.

आतापर्यंत चेन्नईत विजय मिळवलेल्या संघांना मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. याच मैदानावर कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मुंबईने 152 धावा केल्या होत्या, परंतू कोलकाताला हे आव्हानही कठीण गेले. हैदराबादने याच मैदानावर कोलकाताला 187 धावांवर रोखले. मात्र, त्यांना प्रत्युत्तरात 177 धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यातही हैदराबादला 150 धावा करणे कठीण गेले होते.

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 8 वेळा विजय मिळवले आहेत. गेल्या आयपीएल मोसमात या दोन्ही संघांनी प्रत्येकी एकदा एकमेकांना पराभूत केले होते.

संभाव्य प्लेईंग XI

मुंबई इंडियन्स –

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, नॅथन कूल्टर नाईल / मार्को जानसेन, जसप्रीत बुमराह.

सनरायझर्स हैदराबाद – वृध्दिमान साहा (यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, जॉनी बेअरस्टो, प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि शाहबाज नदीम.

Story img Loader