आयपीएल २०२१च्या ३८ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स अबुधाबीमध्ये आमनेसामने आले आहेत. कोलकात्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी केकेआरने त्यांच्या प्लेइंग -११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जच्या संघात बदल करण्यात आला आहे. हा बदल पाहून सर्वांनाच धक्का बसला.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात ड्वेन ब्राव्होऐवजी सॅम करनला संधी दिली. ब्राव्हो शेवटच्या सामन्यात सामनावीर ठरला होता. मात्र असे असूनही धोनीने त्याच्या जागी करनला का संधी दिली असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. धोनीनेच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. आरसीबीविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर धोनीने ब्राव्होला ‘भाऊ’ असे म्हटले होते.

नाणेफेकीनंतर धोनी म्हणाला, ”आम्ही या सामन्यासाठी संघात बदल केला आहे. ब्राव्होच्या जागी करनला संधी देण्यात आली आहे. सीपीएल दरम्यान ब्राव्होला स्नायूंचा ताण होता. त्यामुळे त्याची दुखापत आणखी वाढू नये, अशी आमची इच्छा होती. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. संघात अनुभवी खेळाडू असणे महत्त्वाचे आहे.”

हेही वाचा – भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचं झालं निधन

चेन्नई संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी ९ पैकी ७ सामने जिंकले आहेत आणि त्यांचे १४ गुण झाले आहेत. जर त्यांनी आज कोलकाताला हरवले, तर प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. अबुधाबीच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे असणार नाही. अशा परिस्थितीत फिरकी गोलंदाज यावर प्रभावी ठरू शकतात.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जोश हेझलवूड.

कोलकाता नाईट रायडर्स : व्यंकटेश अय्यर, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, इऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, लॉकी फर्ग्युसन, प्रसिध कृष्णा आणि वरुण चक्रवर्ती.

Story img Loader