आयपीएल २०२१चा ५३वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज दरम्यान खेळला जात आहे. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. धोनीने सामन्यापूर्वी सांगितले की, ”मला पुढील हंगामात चेन्नईकडून खेळायचे आहे, पण दोन नवीन संघ आल्यानंतर कोणालाही काही माहिती नाही.” आयपीएल २०२२ पासून ८ ऐवजी १० संघ मैदानात उतरतील. या महिन्यात २ नवीन संघांचा लिलाव होणार आहे.
धोनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, ‘फिटनेस राखणे कठीण आहे. आयपीएल पुढे ढकलणे म्हणजे तुम्हाला नेहमी कमी वेळेत जास्त खेळावे लागेल. व्यक्तिशः मला त्याची चिंता नाही. बरीच अनिश्चितता आहे. २ नवीन संघ जोडले जाणार आहेत. आम्हाला रिटेन्शन नियमाबद्दल माहिती नाही. यासारख्या इतर गोष्टी आहेत.”
हेही वाचा – जबरदस्तच..! भारताची कुस्तीपटू अंशु मलिकची ऐतिहासिक कामगिरी
अलीकडेच, धोनी म्हणाला होता, की त्याला चेन्नईमध्ये शेवटचा सामना खेळायचा आहे. धोनी २०१९ पासून चेन्नईमध्ये एकही सामना खेळलेला नाही. सीएसकेने धोनीच्या नेतृत्वाखाली तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय हा संघ दोन वेळा टी-२० चॅम्पियन्स लीगचा चॅम्पियनही बनला आहे. सध्याच्या मोसमाबद्दल बोलायचे झाले तर संघाने आतापर्यंत १३ पैकी ९ सामने जिंकले आहेत.
पंजाबविरुद्धच्या सामन्यातही धोनी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याने २ चौकारांसह १२ झावा केल्या. पंजाबचा फिरकीपटू रवी बिश्नोईने त्याला गुगलीवर क्लीन बोल्ड करत तंबूत धाडले.