कोलकात्यानं मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला. मुंबईनं कोलकात्यासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान कोलकात्यानं ३ गडी गमवून १६ व्या षटकात पूर्ण केलं. वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांच्या अर्धशतकी खेळीमुळे हा विजय सोपा झाला. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमरानं ३ गडी बाद केले. या पराभवानंतर मुंबई संघाची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर कोलकात्याचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला. मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग या पराभवामुळे खडतर झाला आहे.

कोलकात्याचा डाव

कोलकाता संघानं मुंबईनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आक्रमक खेळी केली. शुभमन गिल आणि वेंकटेश अय्यर या जोडीनं चांगली सुरुवात केली. शुबमन गिल १३ धावा करून बाद झाला. त्याने एक षटकार आणि एक चौकार मारला. जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी राहुल त्रिपाठी आणि वेंकटेश अय्यरने अर्धशतकी भागीदारी केली. कोलकात्याच्या वेंकटेश अय्यरने विस्फोटक फलंदाजी करत २५ चेंडूत अर्धशतक झळकावलं. या खेळीत ३ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश आहे. ५३ धावांवर असताना बुमराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. अय्यरनंतर राहुल त्रिपाठीने अर्धशतक झळकावलं. त्रिपाठीने ४२ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी केली. कोलकात्याचा कर्णधार इऑन मॉर्गनला साजेशी खेळी करता आली नाही. तो ७ करून बाद झाला.

मुंबईचा डाव

मुंबईनं कोलकात्यासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबई विरुद्धच्या सामन्यात कोलकात्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानंतर फलंदाजीसाठी आघाडीला आलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि डिकॉकने चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. रोहित शर्माने ३० चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. तर डिकॉकने अर्धशतकी खेळी केली. डिकॉकने ४२ चेंडूत ५५ धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर फलंदाज साजेशी कामगिरी करू शकले नाही. मोठे फटके मारताना एका मागोमाग एक बाद झाले. सुर्यकुमार ५ धावा, इशान किशन १४ धावा, पोलार्ड २१ धावा, तर कृणाल पांड्या १२ धावा करून बाद झाला. कोलकात्याकडून प्रसिद्ध क्रिष्णाने २, लॉकी फर्ग्युसनने २, तर सुनील नरेननं एक गडी बाद केला. तर किरॉन पोलार्डला इऑन मोर्गननं धावचीत केलं.

Live Updates
22:58 (IST) 23 Sep 2021
कोलकात्याचा ७ गडी राखून मुंबई इंडियन्सवर विजय

कोलकात्यानं मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला. मुंबईनं कोलकात्यासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान कोलकात्यानं ३ गडी गमवून १६ व्या षटकात पूर्ण केलं. वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांच्या अर्धशतकी खेळीमुळे हा विजय सोपा झाला. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमरानं ३ गडी बाद केले.

https://twitter.com/KKRiders/status/1441092449795932162

22:55 (IST) 23 Sep 2021
कोलकात्याला तिसरा धक्का

इऑन मॉर्गन ७ धावा करून बाद झाला. बुमराच्या गोलंदाजीवर ट्रेन्ट बोल्टनं त्याचा झेल घेतला.

https://twitter.com/mipaltan/status/1441090636619255812

22:42 (IST) 23 Sep 2021
कोलकात्याला दुसरा धक्का; वेंकटेश अय्यर बाद

वेंकटेश ३० चेंडूत ५३ धावा करून बाद झाला आहे. या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

https://twitter.com/mipaltan/status/1441087502610145281

22:38 (IST) 23 Sep 2021
अय्यरनंतर राहुल त्रिपाठीचं अर्धशतक

कोलकात्याच्या राहुल त्रिपाठीने २९ चेंडूत ५० धावा केल्या. त्यात पाच चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.

https://twitter.com/KKRiders/status/1441087182425321488

22:32 (IST) 23 Sep 2021
वेंकटेश अय्यरची अर्धशतकी खेळी

अय्यरची चांगलीच चर्चा आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात वेंकटेश अय्यरने दमदार कामगिरी करून दाखवली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनंतर आता मुंबई इंडियन्सविरोधातील त्याने विस्फोटक फलंदाजी केली. कोलकात्याच्या वेंकटेश अय्यरने विस्फोटक फलंदाजी करत २५ चेंडूत अर्धशतक झळकावलं. या खेळीत ३ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश आहे. डावखुऱ्या अय्यरची फलंदाजी पाहिली तर आयपीएलमध्ये पहिल्यांदा खेळतोय. यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि फलंदाजीने छाप सोडली. वेंकटेश अय्यरने २७ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४१ धावा केल्या होत्या. २६ वर्षीय अय्यर मध्यप्रदेशकडून क्रिकेट खेळतो. फलंदाजीसोबत वेंकटेश अय्यर गोलंदाजीही करतो.

या खेळाडूनं क्रिकेटसोबत चांगलं शिक्षणही घेतलं आहे. वेंकटेश अय्यर एमबीए पदवीधर आहे. मात्र क्रिकेटसाठी अय्यर सीएचं अंतिम वर्ष आणि मल्टिनॅशनल कंपनीची नोकरी क्रिकेटसाठी सोडली आहे. आईच्या आग्रहानंतर त्याने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचं ठरवलं. वेंकटेशने १९ व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.

https://twitter.com/KKRiders/status/1441085689840373761

22:28 (IST) 23 Sep 2021
कोलकात्याच्या राहुल त्रिपाठी आणि वेंकटेश अय्यरची अर्धशतकी भागीदारी

दुसऱ्या गड्यासाठी राहुल त्रिपाठी आणि वेंकटेश अय्यर यांनी अर्धशतकी भागीदारी केली.

https://twitter.com/KKRiders/status/1441083194128797699

22:27 (IST) 23 Sep 2021
कोलकात्याच्या राहुल त्रिपाठी आणि वेंकटेश अय्यरची अर्धशतकी भागीदारी

कोलकात्याच्या दुसऱ्या गड्यासाठी राहुल त्रिपाठी आणि वेंकटेश अय्यरने अर्धशतकी भागीदारी केली.

https://twitter.com/KKRiders/status/1441083194128797699

21:57 (IST) 23 Sep 2021
कोलकात्याला पहिला धक्का

शुबमन गिल १३ धावा करून बाद झाला. त्याने एक षटकार आणि एक चौकार मारला. जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

https://twitter.com/mipaltan/status/1441076452137390092

21:48 (IST) 23 Sep 2021
मुंबईचा डाव

मुंबईनं कोलकात्यासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यात कोलकात्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानंतर फलंदाजीसाठी आघाडीला आलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि डिकॉकने चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. रोहित शर्माने ३० चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. तर डिकॉकने अर्धशतकी खेळी केली. डिकॉकने ४२ चेंडूत ५५ धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर फलंदाज साजेशी कामगिरी करू शकले नाही. मोठे फटके मारताना एका मागोमाग एक बाद झाले. सुर्यकुमार ५ धावा, इशान किशन १४ धावा, पोलार्ड २१ धावा, तर कृणाल पांड्या १२ धावा करून बाद झाला. कोलकात्याकडून प्रसिद्ध क्रिष्णाने २, लॉकी फर्ग्युसनने २, तर सुनील नरेननं एक गडी बाद केला. तर किरॉन पोलार्डला इऑन मोर्गननं धावचीत केलं.

https://twitter.com/mipaltan/status/1441070275085291520

21:26 (IST) 23 Sep 2021
मुंबईचं कोलकात्यासमोर १५६ धावांचं आव्हान

मुंबईनं ६ गडी गमवून १५५ धावा केल्या. कोलकात्यासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान आहे.

https://twitter.com/KKRiders/status/1441068943880306696

21:24 (IST) 23 Sep 2021
मुंबई इंडियन्सला सहावा धक्का

कृणाल पांड्या १२ धावा करून बाद झाला

21:03 (IST) 23 Sep 2021
मुंबई इंडियन्सला चौथा धक्का

इशान किशन १४ धावा करून तंबूत परतला आहे. लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर उंच फटका मारल्यानंतर सीमारेषेवर आंद्रे रसेलने त्याचा झेल घेतला.

https://twitter.com/IPL/status/1441062756036141057

20:53 (IST) 23 Sep 2021
मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का, डिकॉक ५५ धावा करून बाद

क्विंटॉन डिकॉक ५५ धावा करून तंबूत परतला आहे. त्याने ४२ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर सुनील नरेननं त्याचा झेल घेतला. प्रसिद्ध क्रिष्णाने सामन्यात आतापर्यंत दोन गडी बाद केले आहेत.

https://twitter.com/KKRiders/status/1441057532928159746

20:43 (IST) 23 Sep 2021
क्विंटॉन डिकॉकचं अर्धशतक

क्विंटॉन डिकॉकनं ३८ चेंडूत ५४ धावा केल्या आहेत. या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1441057452284276741

20:33 (IST) 23 Sep 2021
मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का

सुर्यकुमार ५ धावा करून बाद झाला आहे. प्रसिद्ध क्रिष्णाच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने त्याचा झेल घेतला.

https://twitter.com/KKRiders/status/1441055609546108930

20:19 (IST) 23 Sep 2021
मुंबई इंडियन्सला पहिला धक्का; रोहित शर्मा ३३ धावा करून बाद

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ३३ धावा करून तंबूत परतला आहे. सुनील नरेनच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. शुबमन गिलनं त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. रोहितने ३० चेंडूत ३३ धावा केल्या. यात ४ चौकारांचा समावेश आहे.

https://twitter.com/KKRiders/status/1441052060951060485

19:59 (IST) 23 Sep 2021
रोहित शर्मा - डिकॉकची अर्धशतकी भागीदारी

रोहित शर्मा आणि डिकॉकनं मुंबई इंडियन्स चांगली सुरुवात करून दिली आहे. दोघांनी मिळून ५० धावांची भागीदारी केली आहे. यात रोहित शर्मा २७ तर डिकॉक २५ धावांवर खेळत आहे. ६ षटकात मुंबईने बिनबाद ५६ धावा केल्या आहेत.

https://twitter.com/mipaltan/status/1441046918314946570

19:20 (IST) 23 Sep 2021
कोलकाताचा संघ

शुबमन गिल, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इऑन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, सुनील नरेन, प्रसिध्द क्रिष्णा, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती

19:17 (IST) 23 Sep 2021
मुंबईचा संघ

क्विंटॉन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, सौरभ तिवारी, किरोन पोलार्ड, कृणाल पांड्या,अडम मिलने, राहुल चहर, जसप्रीत बुमरा, ट्रेन्ट बोल्ट