आयपीएल २०२१ स्पर्धेत गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी साजेशी झालेली नाही. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमध्ये जाणार की नाही? याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगू लागली आहे. दुसऱ्या टप्प्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट राइडर्सकडून पराभवाचं तोंड पहिल्यानंतर प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. त्यामुळे उर्वरित पाचही सामने मुंबई इंडियन्सला जिंकावे लागणार आहेत. अन्यथा इतर संघाच्या कामगिरीवर मुंबई इंडियन्स भवितव्य अवलंबून असणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर सनरायजझर्स हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना मुंबई इंडियन्सला जिंकणं भाग आहे. त्यामुळे सामन्यात विराट विरुद्ध रोहित अशी लढत पाहायला मिळणार आहे.

आयपीएल गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सचा संघ १६ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर चेन्नईचा संघ १४ गुणांसह दुसऱ्या, बंगळुरूचा संघ १० गुणांसह तिसऱ्या, कोलकात्याचा संघ ८ गुणांसह चौथ्या, पंजाबचा संघ ८ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. तर मुंबईचा संघ ८ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे बंगळुरू, कोलकाता, पंजाब आणि मुंबई या संघात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. मुंबईचा संघ आतापर्यंत ९ सामने खेळला असून ४ सामन्यात विजय, तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. मुंबईचा नेट रनरेट हा उणे ०.३१० आहे.

IPL 2021: बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार की नाही?; झहीर खान म्हणाला…

मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेचे पाच किताब आपल्या नावावर केले आहेत. मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये किताब जिंकला आहे. त्यामुळे यंदा किताब जिंकून हॅट्ट्रीक करण्याची संधी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाला आहे.

मुंबईचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), एडम मिल्ने, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, अर्जुन तेंडुलकर, क्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दीक पंड्या, इशान किशन, जेम्स नीशम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, मार्को जेनसेन, मोहसिन खान, नाथन कुल्टर नाइल, पीयूष चावला, क्विटन डी कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, युद्धवीर सिंह

Story img Loader