मुंबई इंडियन्सच्या संघाला आयपीएलच्या उर्वरित पर्वामध्ये आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ जेतेपदापासून सध्या तरी फार दूर दिसत आहे. असं असलं तरी रोहित शर्मा त्याच्या संघ सहकाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. उरलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये मोठे विजय मिळवून अंतिम चारमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी रोहितचा संघ प्रयत्न करत आहे. गुणतालिकेमध्ये नेट रनरेट वाढला तरच मुंबईला चौथ्या स्थानापर्यंत झेप मारुन प्लेऑफसाठी जागा निश्चित करता येईल. सध्या मुंबई आणि पंजाब दोन्ही संघाचे प्रत्येकी १० अंक आहेत. एकीकडे या आकडेमोडीचं टेन्शन असतानाच दुसरीकडे रोहितने स्वत:च्या इन्स्टाग्रामवरुन एक मजेदार व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओ रोहित त्याच्या पत्नीला घाबरवणारा एक प्रँक करताना दिसतोय.
रोहितने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये रोहितची पत्नी रितिका सजदेहसुद्धा दिसत आहे. व्हिडीओ रोहितच्या चाहत्यांना फारच आवडला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित त्याच्या पत्नीला घाबरवताना दिसतोय. रोहितने स्वत:च हा व्हिडीओ शेअर केलाय. रोहित व्हिडीओच्या सुरुवातीला आपल्या डाव्या हातामध्ये चॉकलेट ठेवतो आणि मूठ झाकतो. त्यानंतर तो रितिकाजवळ जातो आणि तिला मूठ उघडण्यास सांगतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा