आयपीएल २०२१मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शारजाहच्या मैदानावर सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईने राजस्थानवर ८ गडी राखून झटपट विजय मिळवला. वेगवान गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने राजस्थानला प्रथम २० षटकात ९ बाद ९० धावांवर रोखले. मुंबईचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी सुमार कामगिरीचे प्रदर्शन केले. तर मुंबईकडून संधी मिळालेल्या जेम्स नीशमने ३, नॅथन कुल्टर नाईलने ४ आणि बुमराहने २ बळी घेतल राजस्थानच्या डावाला सुरुंग लावला. प्रत्युत्तरात इशानने तुफानी आणि नाबाद अर्धशतक ठोकत संघाला नवव्या षटकात विजय मिळवून दिला. मुंबईच्या कुल्टर नाईलला सामनावीर पुरस्कार मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईचा डाव

रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. रोहितने आक्रमक पवित्रा धारण करत मुस्तफिजूरच्या पहिल्याच षटकात १४ धावा ठोकल्या. तिसऱ्या षटकात रोहितला जीवदान मिळाले, पण त्याला या जीवदानाचा फायदा उचलता आला नाही. राजस्थानचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने त्याला झेलबाद केले. रोहितने २२ धावा केल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने मुंबईचे अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात सूर्यकुमार झेलबाद झाला. ६ षटकात मुंबईने २ बाद ५६ धावा केल्या. त्यानंतर इशान किशनने आठव्या षटकात साकारियाची धुलाई करत २४ धावा कुटत मुंबईला विजयाजवळ नेले. नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इशानने षटकार ठोकत मुंबईला विजय मिळवून दिला. इशानने २५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५० धावा केल्या.

राजस्थानचा डाव

मुंबईकर फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि एविन लुईस यांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. फिरकीपटू जयंत यादवने टाकलेल्या दुसऱ्या षटकात जयस्वाल-लुईसने १५ धावा वसूल केल्या. वेनवान गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलने चौैथ्या षटकात मुंबईकर फलंदाज यशस्वीला यष्टीपाठी झेलबाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. यशस्वीने १२ धावा केल्या. त्यानंतर पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात राजस्थानचा दुसरा सलामीवीर लुईसही माघारी परतला. जसप्रीत बुमराहने त्याला पायचीत पकडले. लुईसने ३ चौकार आणि एका षटकारासह २४ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये राजस्थानने २ बाद ४१ धावा केल्या. पुढच्याच षटकात जेम्स नीशामने राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनला झेलबाद केले. नीशामने मुंबईला अजून एक यश मिळवून दिले. त्याने नवव्या षटकात पुन्हा गोलंदाजीला येत डावखुऱ्या शिवम दुबेचा त्रिफळा उडवला. पन्नास धावा पूर्ण होण्याच्या आत राजस्थानने आपले चार महत्त्वाचे फलंदाज गमावले. १०व्या षटकात राजस्थानने अर्धशतक फलकावर लावले. ५० धावांवर असतानाना राजस्थानने आपला पाचवा फलंदाज ग्लेन फिलिप्सच्या रुपात गमावला. कुल्टर नाईलने त्याचा सुंदर त्रिफळा उडवला. त्यानंतर डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी संघाला थोडा आधार दिला. पण, १५व्या षटकात नीशमने तेवतियाला बाद करत राजस्थानला सहावा धक्का दिला. नीशमने अप्रतिम गोलंदाजी करत ४ षटकात केवळ १२ धावा देत ३ बळी घेतले. पुढच्याच षटकात बुमराहने श्रेयस गोपालला खातेही खोलू दिले नाही. एका बाजूने किल्ला लढवत असलेला डेव्हिड मिलरही कुल्टर नाईलचा बळी ठरला. मिलरने १५ धावा केल्या. मुंबईने २० षटकात राजस्थानला ९ बाद ९० धावांवर रोखले. नीशमव्यतिरिक्त वेगवान गोलंदाज कुल्टर नाईलने १४ धावांत ४, तर बुमराहने १४ धावांत २ बळी घेतले.

दोन्ही संघांत बदल

आजच्या सामन्यात दोन्ही कर्णधारांनी आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केले होते. मुंबईचा कप्तान रोहित शर्माने सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक आणि कृणाल पंड्या यांना बाहेर बसवले आणि इशान किशन आणि जेम्स नीशमला संधी दिली. तर राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने वेगवान गोलंदाज कुलदीप यादव आणि फिरकीपटू श्रेयस गोपालला संधी दिली होती.

हेही वाचा – “भारत हा खालच्या दर्जाचा संघ, त्यांना माहितीय की…”, पाकिस्तानच्या अब्दुल रझ्झाकची मुक्ताफळं

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, जेम्स नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.

राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, ग्लेन फिलिप्स, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, कुलदीप यादव, श्रेयस गोपाल, चेतन साकारिया, मुस्तफिजूर रहमान.