प्लेऑफ गाठण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला ४२ धावांनी मात दिली आहे. निव्वळ धावगतीसाठी अपेक्षित धावसंख्येवर हैदराबादला रोखता आले नसल्याने मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. नाणेफेक जिंकलेल्या मुंबईने हैदराबादला २० षटकात २३६ धावांचे आव्हान दिले. प्लेऑफ गाठण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला २० षटकात २३६ धावांचे आव्हान दिले आहे. कोलकाता नाइट रायडर्सपेक्षा चांगला नेट रनरेट होण्यासाठी मुंबईने हैदराबादला १७१ धावांनी पराभूत करणे आवश्यक होते. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या मुंबईने सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली सलामीवीर फलंदाज इशान किशनच्या ३२ चेंडूत ८४ आणि सूर्यकुमार यादवच्या ४० चेंडूतील ८२ धावांच्या योगदानामुळे मुंबईला दोनशेपार जाता आले. प्रत्युत्तरात कप्तान मनीष पांडेने झुंज दाखवली पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले आणि हैदराबादला २० षटकात ८ बाद १९३ धावांवरच पोहोचता आले. किशनला सामनावीर पुरस्कार मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हैदराबादचा डाव

जेसन रॉय आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी पाचव्या षटकात अर्धशतकी सलामी दिली. रॉय-शर्मा यांनी पहिल्या गड्यासाठी ६४ धावा करताच मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने ६व्या षटकात रॉयला झेलबाद केले. रॉयने ६ चौकारांसह ३४ धावा केल्या. त्यानंतर अभिषेक शर्माची साथ देण्यासाठी हैदराबादचा कप्तान मनीष पांडे मैदानात आला. मुंबईकडून पदार्पण करणाऱया पियुष चावलाने मोहम्मद नबीला माघारी धाडत हैदराबादला तिसरा धक्का दिला. ९व्या षटकात हैदराबादने शतक पूर्ण केले. १६व्या षटकात मनीषने आपले अर्धशतक पूर्ण केले. पांडेने ७ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६९ धावा केल्या. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या विजयासह मुंबईने स्पर्धेची सांगता १४ गुणांनी केली.

हेही वाचा – T20 World Cup : रोहित-विराटच्या बैठकीत भारतीय संघ बदलणार?; ‘या’ मुंबईकर खेळाडूला मिळू शकते संधी!

मुंबईचा डाव

मागील सामन्यातील फॉर्म कायम राखत इशान किशनने रोहित शर्मासोबत आक्रमक सुरुवात केली. चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर इशानने षटकार ठोकत मुंबईचे अर्शतक फलकावर लावले. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात मुंबईचा कप्तान रोहित शर्मा माघारी परतला. राशिद खानने त्याला वैयक्तिक १८ धावांवर तंबूत धाडले. रोहित-इशानने पहिल्या गड्यासाठी ८० धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतरही इशानने आपली दे-दणादण फटकेबाजी सुरू ठेवली. मुंबईने आठव्या षटकात आपले शतक फलकावर लावले. १०व्या षटकात हैदराबादचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने किशनला यष्टीपाठी झेलबाद करत मुंबईला संकटात टाकले. इशानने ३२ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांसह ८४ धावांची खेळी केली.

इशाननंतर सूर्यकुमार यादवने मोर्चा सांभाळला. दुसऱ्या बाजूने हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या अपयशी ठरले असले तरी, सूर्याने धावगती वाढवली. १७व्या षटकात सूर्यकुमार यादवने कौलला चौकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात मुंबईने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. जेसन होल्डरने शेवटच्या षटकात सूर्यकुमारला फसवले. सूर्याने ४० चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात होल्डरने फक्त ५ धावा दिल्यामुळे मुंबईला अडीचशेचा टप्पा गाठता आला नाही. मुंबईने २० षटकात ९ बाद २३५ धावा केल्या. होल्डरने ४ बळी घेतले. या धावसंंख्येसह मुंबईने आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्येचा नवा विक्रम नोंदवला. याआधी मुंबईने २०१७मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध ६ बाद २२३ धावा ठोकल्या होत्या.

Live Updates
19:34 (IST) 8 Oct 2021
मुंबईच्या फलंदाजीला सुरुवात

रोहित शर्मा आणि इशान किशनने मुंबईसाठी सुरुवात केली.

19:17 (IST) 8 Oct 2021
हैदराबादची प्लेईंग इलेव्हन

जेसन रॉय, अभिषेक शर्मा, मनीष पांडे (कप्तान), प्रियम गर्ग, अब्दुल समद, वृद्धिमान साहा, जेसन होल्डर, राशिद खान, मोहम्मद नबी, उमरान मलिक, सिद्धार्थ कौल.

19:15 (IST) 8 Oct 2021
मुंबईची प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, जेम्स नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, ट्रेंट बोल्ट.

19:12 (IST) 8 Oct 2021
मुंबईनं जिंकला टॉस

आजच्या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केन विल्यमसन दुखापतग्रस्त असल्याने मनीष पांडे हैदराबादचे नेतृत्व करत आहे.

18:49 (IST) 8 Oct 2021
थोड्याच वेळात होणार टॉस

दोन्ही संघ सामन्यासाठी सज्ज झाले असून सात वाजता नाणेफेक होणार आहे.

17:23 (IST) 8 Oct 2021
सामन्याची वेळ

हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.

17:22 (IST) 8 Oct 2021
संभाव्य प्लेईंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, जेम्स नीशम, नॅथन कुल्टर-नाईल, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.

सनरायझर्स हैदराबाद – जेसन रॉय, अभिषेक शर्मा, केन विलियमसन (कप्तान), प्रियम गर्ग, जेसन होल्डर, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, उमरान मलिक.

17:19 (IST) 8 Oct 2021
खेळपट्टी आणि हवामान

आयपीएलच्या या हंगामात अबुधाबीतील फलंदाजांना इतर खेळपट्ट्यांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना सामन्यात फलंदाजी करणे सोपे होऊ शकते. सलामीच्या डावातही फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची दिसून येते. संध्याकाळच्या वेळी दवाचा परिणाम जाणवू शकतो.

17:18 (IST) 8 Oct 2021
हेड-टू-हेड

आयपीएलमधील दोन्ही संघांचे रेकॉर्ड बघितले, तर या प्रकरणात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोघेही जवळपास समसमान आहेत. २०१३ पासून मुंबई आणि हैदराबाद दरम्यान एकूण १७ सामने खेळले गेले आहेत. यापैकी मुंबईने सात सामने आणि हैदराबादने आठ सामने जिंकले. या दरम्यान, एका सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही.