पर्पल कॅपच्या शर्यतीत अग्रस्थानी असलेल्या हर्षल पटेलने (४/१७) मिळवलेली हॅट्ट्रिक आणि ग्लेन मॅक्सवेल (५६ धावा), कर्णधार विराट कोहली (५१) यांनी केलेल्या उत्तम फलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रविवारी मुंबई इंडियन्सला ५४ धावांनी धूळ चारली. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सची गुणतालिकेमध्ये सातव्या स्थानावर घसरण झालीय. मागच्या रविवारी सुरु झालेल्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या पर्वामध्ये मुंबईच्या संघाची पराभवाची मालिका सुरुच आहे. सलग तीन पराभव झाल्याने मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये जाईल की नाही हे सुद्धा आता सांगणं कठीण झालं आहे. मुंबईचे या स्पर्धेमधील प्लेऑफ सुरु होण्यापूर्वीचे केवळ चार सामने शिल्लक आहेत. त्यामुळेच आता मुंबईसाठी प्ले ऑफचा मार्ग आणखीन खडतर झालाय. तर रविवारी कोलकात्यावर मिळावलेल्या विजयामुळे धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफमधील स्थान जवळजवळ निश्चित झालंय. एकीकडे मुंबईच्या चाहत्यांची सलग तिसरा पराभव झाल्याने चिंता वाढली असली तरी दुसरीकडे सीएसकेबरोबरच दिल्ली आणि बंगळूरुच्या संघांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हे तिन्ही संघ प्लेऑफमध्ये खेळणार हे जवळजवळ निश्चित झालंय. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी काय करावं लागणार आहे ते पाहूयात…
नक्की वाचा >> ‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं कर्णधारपद? BCCI कडे विराटच्या Attitude बद्दल केलेली तक्रार
सर्वात सोपा मार्ग…
अगदी आदर्श स्थितीमध्ये मुंबईला त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहे. प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल आणि इतर संघांवर निर्भर रहायचं नसेल तर रोहितच्या संघासमोर ४ पैकी ४ विजय हा सर्वात सोपा मार्ग आहे. शेवटचे चारही सामने जिंकले तर त्यांचे एकूण गुण १६ होतील. म्हणजेच त्यांना या साखळी फेरीतील सामने संपताना चौथं स्थान मिळवता येईल. मुंबईचा संघ दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि हैदराबादविरोधात आपले उर्वरित सामने खेळणार आहे. हे चारही संघ सुद्धा फरसे फॉर्मात नसल्याने मुंबईला अजूनही प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे.
नक्की वाचा >> IPL 2021: “मी असतो तर कर्णधारपद सोडलं असतं”; ‘त्या’ कृतीमुळे संतापला गौतम गंभीर
IPL 2021 Playoffs: …तर मुंबई इंडियन्स स्पर्धेतून पडणार बाहेर; CSK, RCB च्या चाहत्यांसाठी मात्र…
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुकडून रविवारी झालेला पराभव हा मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव ठरला असून त्यांचा प्लेऑफचा मार्ग खडतर झालाय.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-09-2021 at 14:46 IST
TOPICSआयपीएल २०२१ (IPL 2021)IPL 2021क्रिकेट न्यूजCricket Newsचेन्नई सुपर किंग्सChennai Super KingsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi Newsमुंबई इंडियन्स (Mumbai Indians)Mumbai Indiansरॉयल चॅलेंजर्स बंगळुरुRoyal Challengers Bangalore
+ 3 More
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 playoffs updates check how mumbai indians can still qualify for playoffs even after registering record 6th defeat this ipl scsg