इंडियन प्रीमियर लीग म्हणजेय आयपीएलमध्ये शेवटचे काही सामने शिल्लक असतानाही प्लेऑफमध्ये जाणाऱ्या चौथ्या संघाबद्दलचा संभ्रम कायम आहे. प्रत्येक संघाचा एक सामना शिल्लक असून आज चार संघ साखळी फेरीतील त्यांचा अंतिम सामना खेळणार आहे. मात्र या उरलेल्या चार सामन्यांमध्ये काही संघाचा पराभव किंवा विजय झाल्यास तब्बल चार संघांचे समसमान म्हणजे प्रत्येकी १२ गुण होती. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु यांनी आधीच प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किग्ज आणि राजस्थान रॉयल्समध्ये चौथ्या स्थानासाठी चुरस कायम आहे. या चारही संघाचे प्रत्येक १२ गुण झाल्यास काय होईल ते आपण जाणून घेऊयात. आधी प्रत्येक संघाची स्थिती काय आहे आणि या चारही संघाचे गुण १२ कसे होऊ शकतात हे बघूयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> IPL 2021 Playoffs: …तर शेवटचा सामना खेळण्याआधी आजच ‘मुंबई इंडियन्स’ होणार OUT

पंजाबची टीम १२ वर कशी जाणार?
पहिला सामना दुपारी साडेतीन वाजता चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जदरम्यान आहे. या सामन्यामध्ये पंजाबने चेन्नईला पराभूत केल्यास ते आपल्या १४ पैकी सहा सामने जिंकून १२ गुणांची कमाई करतील. या पराभवाचा चेन्नईवर गुणतालिकेच्या दृष्टीकोनातून सध्या तरी काही परिणाम होणार नाहीय.

राजस्थानलाही संधी…
आजचा दुसरा सामना सायंकाळी साडेसात वाजता दोन वेळचा विजेता कोलकाता नाइट रायडर्स आणि सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला राजस्थान रॉयल्सदरम्यान होणार आहे. या सामन्यामध्ये राजस्थानने विजय मिळवला तर आज दिवस संपेपर्यंत मुंबई पुन्हा सातव्या स्थानी जाऊ शकते. राजस्थानने विजय मिळवला तर त्यांचेही १२ अंक होती. कोलकाता सध्या १२ अंकांसहीत चौथ्या स्थानी आहे. पंजाबने चेन्नईला पराभूत केल्यास ते सुद्धा १२ अंकांसहीत तळाच्या दोन संघांमध्ये नसतील हे निश्चित आहे.

…तर मुंबईचेही १२ अंक
उद्याच्या सामन्यांबद्दल बोलायचं झाल्यास उद्या मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यामध्ये मुंबईने विजय मिळवल्यास ते गुणतालिकेमध्ये पुन्हा वर जातील. मुंबई सध्या गुणतालिकेमध्ये १० अंकासहीत पाचव्या स्थानी आहे.

दुसऱ्या स्थानासाठीही चुरस
उद्याच्या दुसऱ्या सामन्यामध्ये दिल्ली आणि बंगळुरुचे संघ एकमेकांच्या समोर असतील. ज्याप्रमाणे चौथ्या जागेसाठी चुरस आहे त्याचप्रमाणे आज चेन्नई पराभूत झाल्यास उद्या बंगळुरुला विजय मिळवून दुसऱ्या जागी जाण्याची संधी आहे.

सर्व संघाचे गुण १२ असतील तर काय?
आता वरचे सारे जर तर वाचल्यानंतर तुम्हाला पडलेला प्रश्न असणार की सर्वच संघाचे १२-१२ गुण झाल्यास चौथं स्थान कोणाला मिळणार? तर चेन्नई पंजाब वगळता उर्वरित तीन सामन्यांपैकी एकही सामना अगदीच एकांगी झाला नाही तर मुंबई प्लेऑफमधून बाहेर पडेल. नेटरन रेटच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित करतील. मुंबईला फारच भन्नाट कामगिरी करुन म्हणजे दुसऱ्यांदा फलंदाजी करत असतील तर ११ षटकं राखून आणि दुसऱ्यांदा गोलंदाजी करत असतील तर ९० हून अधिक धावांनी सामाना जिंकवा लागाले. तरीही मुंबईच्या आशा धुसरच असतील. त्यामुळेच आता मुंबईला क्वालिफाय होण्याचा सर्वोत्तम चान्स हा कोलकात्याचा पराभव आणि हैदराबादवर मोठा विजय हाच आहे. कोलकाता आणि मुंबई वगळता नेट रनरेटच्या जोरावर राजस्थान आणि पंजाब प्लेऑफपर्यंत जाण्याची शक्यता फारच कमी आहे. हैदराबादचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलाय.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 playoffs what if mi rr kkr pbks all four teams have 12 points each scsg