आयपीएल २०२१ स्पर्धेत कोलकातानं राजस्थान रॉयल्सला पराभूत करत प्लेऑफमध्ये स्थान जवळपास निश्चित केलं आहे. कोलकात्यानं पहिली फलंदाजी करताना राजस्थानसमोर १७२ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचे दोन गडी झटपट बाद झाले. त्यामुळे राजस्थान संघावर दडपण वाढलं. त्यामुळे राजस्थान संघांनं ऐन वेळी फलंदाज बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र पंचांनी बघताच राजस्थानला आपला निर्णय बदलावा लागला.

पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कर्णधार संजू सॅमसन माघारी परतला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे शिवम दुबे फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र ऐनवेळी राजस्थान रॉयल्सने हा निर्णय बदलण्याचा निर्णय घेतला. संघाचे व्यवस्थापक कुमार संगकाराने शिवम दुबे माघारी बोलवत अनुज रावत मैदानात पाठवण्याचा निर्णय घेतला. संगकाराने आवाज दिल्यानंतर शिवम दुबे माघारी परतला आणि अनुज रावत फलंदाजीसाठी सरसावला. मात्र पंचांनी टीव्ही स्क्रिनवर बघितलं. त्यानंतर पंचांनी राजस्थानला आपला निर्णय बदलण्यास भाग पाडलं. त्यानंतर शिवम दुबे पुन्हा मैदानात उतरला.

नियमानुसार कोणताही फलंदाज डगआऊट निघून मैदानात पाय ठेवल्यास तर तो पुन्हा माघारी जाऊ शकत ना्ही. कोणताही संघ ड्रेसिंग रुम किंवा डगआऊटमध्येच फलंदाज बदलण्याचा निर्णय घेऊ शकते. एकदा का मैदानातील सीमारेषेत पाय ठेवला. तर मात्र बदल करता येत नाही. तसाच फलंदाज बाद होण्याचाही निर्णय आहे. जर कोणता फलंदाज तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता सीमारेषेबाहेर पाय ठेवतो आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय नॉटआऊट असेल. तर त्या फलंदाजाला मैदानात पुन्हा बोलवलं जात नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा ८६ धावांनी पराभव करत प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. या सामन्यात राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.