आयपीएल २०२१ स्पर्धेतील रोमहर्षक सामन्यात राजस्थाननं रॉयल्सनं पंजाब किंग्सला २ धावांना पराभूत केलं. या विजयात युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी याचं मोलाचं योगदान होतं. शेवटच्या षटकात राजस्थान संघाला विजयासाठी ४ धावांची आवश्यकता होती.. मात्र कार्तिक त्यागीने पाच निर्धाव चेंडू टाकत आणि २ गडी बाद केले आणि संघाला विजय मिळवून दिला. यानंतर भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमरा याने ट्वीट करत कार्तिक त्यागीचं कौतुक केलं. या ट्वीटला कार्तिक त्यागीनं रिप्लाय दिला आहे.

“काय षटक होतं, कार्तिक त्यागी. अशा प्रकारच्या दबावात डोकं शांत ठेवलंस आणि चांगली कामगिरी केली. खूपच प्रभावशाली”, असं ट्वीट जसप्रीत बुमराने केलं होतं. हे ट्वीट कार्तिक त्यागीने रिट्वीट करत रिप्लाय दिला आहे. “आपल्या हिरोकडून कौतुकाची थाप मिळाल्याने आनंद झाला आहे.”, असं ट्वीट कार्तिक त्यागीने केलं आहे. कार्तिकने ४ षटकात २९ धावा देत २ गडी बाद केले.

जसप्रीत बुमराने अशा प्रकारची कामगिरी आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा केली आहे. डेथ ओव्हरमध्ये कार्तिकने केलेली गोलंदाजी पाहून बुमराही प्रभावित झाला आहे. बुमरा व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेननेही कार्तिकचं कौतुक केलं आहे. नाणेफेक गमावलेल्या संजू सॅमसनच्या संघाने प्रथम फलंदाजी करत एविन लुईस, यशस्वी जयस्वाल आणि महिपाल लोमरोर यांच्या योगदानाच्या जोरावर पंजाबला १८६ धावांचे आव्हान दिले. पंजाबकडून अर्शदीप सिंगने ३२ धावांत ५ बळी घेतले. प्रत्युत्तरात पंजाबचे सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी १२० धावांची दमदार सलामी दिली. मयंकने अर्धशतकी खेळी केली. शेवटच्या षटकात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर पंजाबला २० षटकात १८२ धावाच करता आल्या. त्यागीला सामनावीर पुरस्कार मिळाला.

Story img Loader