आयपीएल २०२१च्या रणसंग्रामाला आता खऱ्या अर्थाने रंग चढू लागला आहे. तीन सामने झाल्यानंतर आता पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. केएल राहुलकडे पंजाबचं नेतृत्व आहे, तर संजू सॅमसनकडे राजस्थान रॉयल्सची कमान सोपवण्यात आली आहे. या दोन्ही संघाच्या व्यवस्थापकांनी यंदाच्या लिलावात चांगली किंमत मोजून आपल्या ताफ्यात नवे खेळाडू समाविष्ट करुन घेतले आहेत. त्यामुळे या सामन्यात नेमकं कोण कुणावर भारी पडणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व पहिल्यांदाच संजू सॅमसनकडे देण्यात आलं आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात संघात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर खेळणार नाही. तर जोस बटलर आणि बेन स्टोक्सकडून संघाला खूप अपेक्षा आहेत. त्याचबरोबर सर्वात जास्त किंमत मोजून घेतलेल्या ख्रिस मॉरिसकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. असं असलं तरी मधल्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

पंजाब किंग्सकडे आक्रमक फलंदाजांचा ताफा असून ही जमेची बाजू आहे. त्यामुळे पहिल्या चेंडुपासून राजस्थान रॉयल्सवर हावी होण्याचा पंजाबचा प्रयत्न असणार आहे. इतर संघाच्या तुलनेत पंजाब संघात सर्वाधिक विदेशी खेळाडू आहेत. त्यामुळे अंतिम ११ मध्ये निवड करताना दमछाक होणार आहे.

तुफानी अर्धशतकानंतर का केलं ‘हटके सेलिब्रेशन’? नितीश राणाने सांगितलं कारण

आयपीएलच्या मागच्या पर्वात राजस्थान रॉयल्सची निराशाजनक कामगिरी होती. त्यामुळे राजस्थानचा संघ सर्वात शेवटी अर्थात आठव्या स्थानावर गुणतालिकेत फेकला गेला होता. एकूण १४ सामन्यांपैकी ८ सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला होता. तर पंजाब किंग्सची कामगिरीही सुमारच राहिली. गुणतालिकेत सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. एकूण १४ सामन्यांपैकी ८ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यंदा दोन्ही संघ चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतील.

एफआयएच प्रो हॉकी लीग : भारताची अर्जेंटिनावर मात

दोन्ही संघातील संभाव्य ११ खेळाडुंची यादी

रायस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैयस्वाल, बेन स्टोक्स, राहुल तेवतिया, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाळ, मुस्ताफिजुर रहमान, कार्तिक त्यागी, चेतन सकारिया

पंजाब किंग्स: केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, शाहरूख खान, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी, झाय रिचर्डसन</p>

 

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 rajasthan royals vs kings xi punjab match may be these 11 players in sqaud rmt
Show comments