रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हर्षल पटेल चांगलाच फॉर्मात असून आयपीएल २०२१ स्पर्धेत सर्वाधिक गडी त्याच्या नावावर आहेत. सर्वाधिक विकेट्स घेतल्याने त्याला पर्पल कॅप देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेत त्याने आपल्या गोलंदाजीची कसब दाखवली. मुंबईचे महत्त्वाचे तीन गडी बाद केल्याने बंगळुरूने सामन्यावर चांगलीच पकड मिळवली. हर्षल पटेलला सर्वात आधी हार्दीक पंड्याची विकेट मिळाली. हार्दीक पंड्या उंच फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. विराट कोहलीने त्याचा झेल तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर स्ट्राइकवर आलेल्या किरोन पोलार्डला त्रिफळाचीत केलं. त्यामुळे मुंबईच्या संघावर दडपड वाढलं. त्यानंतर हॅटट्रिक चेंडूवर राहुल चाहरला पायचीत केलं आणि तंबूचा धाडलं. हार्दीक पटेल या सामन्यात ४ गडी बाद केल्याने त्याच्या नावावर २३ विकेट्स झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हर्षल पटेल पहिला चेंडू वाईड टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर हार्दीक पंड्याची विकेट काढली. त्यानंतर पोलार्डला त्रिफलाचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. तर दीपक चाहरला मैदानात उभंही राहू दिलं नाही. तिसऱ्या चेंडूवर दीपक चाहरला पायचीत केलं. चौथा चेंडू निर्धाव टाकला. पाचव्या चेंडूवर चौकार आला आणि शेवटचा चेंडूवर १ धाव मिळाली.

२०१० च्या आयपीएल स्पर्धेत प्रविण कुमारनं राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात हॅटट्रीक घेतली होती. त्यानंतर सॅम्युअल बद्रीने मुंबई इंडियन्स विरुद्ध २०१७ मध्ये हॅटट्रिक घेतली होती. आता हर्षल पटेलने हॅटट्रिक घेत या पंगतीत स्थान मिळवलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 rcb harshal patel took hattrick against mi rmt