टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली एक उत्तम क्षेत्ररक्षक असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. आज त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात पुन्हा सिद्ध केले. शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात विराटच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले, पण त्याने घेतलेला ऋतुराज गायकवाडचा झेल सर्वांच्या लक्षात राहिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बंगळुरूच्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी उत्तम सुरुवात केली. त्यांनी ७१ धावांची सलामी दिली. नवव्या षटकात विराटने फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलकडे चेंडू सोपवला. चहलने ऋतुराजला विराटकरवी झेलबाद केले. विराटने सूर मारत हा झेल उत्तमरित्या टिपला. विराटने क्षेत्ररक्षणाशिवाय फलंदाजीतही दमदार कामगिरी केली. विराटने ६ चौकार आणि एका षटकारासह ५३ धावांची खेळी केली.

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ६ गड्यांनी मात दिली. नाणेफेक जिंकलेल्या धोनीने विराटसेनेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. दमदार सुरुवात केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेवटच्या पाच षटकात विकेट्स गमावत चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी १५७ धावांचे आव्हान दिले आहे. वाळूच्या वादळामुळे नाणेफेकीला उशीर झाला. नाणेफेकीलाचा कौल धोनीच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या छोट्या मैदानावर प्रेक्षकांना चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल, अशी शक्यता आधीपासूनच वर्तवण्यात येत होती.

हेही वाचा थरारनाट्यच..! विजय मिळाला म्हणून टीम इंडियाच्या खेळाडूंनी केला जल्लोष, इतक्यातच पंचांनी…

विराट-देवदत्तने अर्धशतकी खेळ्या करत १११ धावांची दमदार सलामीही दिली. पण हे दोघे माघारी परतल्यानंतर आरसीबीचे उर्वरित स्टार फलंदाज मोठे फटके खेळू शकले नाहीत. चेन्नईने शेवटच्या पाच षटकात त्यांना केवळ २५ धावा दिल्या. त्यामुळे उत्तम सुरुनवातीनंतरही त्यांनी चेन्नईसमोर १५७ धावांचे आव्हान ठेवता आले. प्रत्युत्तरात चेन्नईने अर्धशतकी सलामी आणि मधल्या फळीतील महत्त्वपूर्ण भागीदाऱ्यांमुळे बंगळरूच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. बंगळुरूच्या धावसंख्येला लगाम घालणाऱ्या चेन्नईच्या ड्वेन ब्राव्होला सामनावीर पुरस्कार मिळाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 rcb vs csk virat kohli takes a sensational catch to dismiss ruturaj gaikwad adn