आयपीएल २०२१ या स्पर्धेत आता गुणतालिकेत अव्वल राहण्यासाठी विराटसेनेची धडपड सुरु झाली आहे. आज कोलकाता विरुद्धचा सामना जिंकून पुन्हा अव्वल येण्याचा विराटसेनेचा मानस असेल. विराटसेनेनं आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्हीही सामने जिंकले आहेत. तर कोलकात्याला एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे कोलकात्याचा संघ पुन्हा एकदा रुळावर आणण्याचा कर्णधार मॉर्गनचा मानस आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याऱ्या खेळाडूत कोलकात्याचा नितीश राणा अव्वल स्थानी आहे. त्याने दोन सामन्यात १३७ धावा केल्या आहेत. तर बंगळुरुचा गोलंदाज हर्षल पटेलनं दोन सामन्यात ७ गडी बाद करत अव्वल स्थानी आहे.
सलग दोन विजय मिळवल्याने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात बंगळुरु संघात सध्या तरी कोणताच बदल होईल असं दिसत नाही. विराट आहे तोच संघ घेऊन पुन्हा मैदानात उतरणार असंच दिसतंय. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू डॅनिअल सॅम हा करोनावर मात करुन पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र त्याला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
कोलकाता नाइटराइडर्सच्या संभाव्य ११ खेळाडुंमध्ये कोणताही बदल होईल असं दिसत नाही. कोलकाता संघ गोलंदाजीत चांगला आहे. त्यामुळे कोलकाताच्या गोलंदाजांसमोर बंगळुरुचे फलंदाज काय कमाल करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
VIDEO : उत्तुंग..! पोलार्डने ठोकला हंगामातील सर्वात मोठा षटकार
आयपीएल स्पर्धेतील हा १० वा सामना आहे. चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियमवर दुपारी ३.३० वाजता खेळला जाणार आहे. त्यामुळे जसं ऊन कमी होत जाईल तसं चेंडू स्विंग होण्यास मदत होईल. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यावर कर्णधार काय निर्णय घेतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
खरा Hit Man… रोहित शर्माने धोनीला मागे टाकत स्वत:च्या नावावर नोंदवला अनोखा विक्रम
दोन्ही संघातील संभाव्य खेळाडू
बंगळुरु: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल, कायल जेमिसन, युजर्वेंद्र चहल, मोहम्मद सिराज, डॅन ख्रिश्चन
कोलकाता: ईऑन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, हरभजन सिंह, प्रसिध कृष्णा