आयपीएल स्पर्धेत आपला संघ वरचढ राहावा आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळावं यासाठी संघाची धडपड सुरु झाली आहे. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनराइजर्स हैदराबाद हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. आयपीएल स्पर्धेतील हा सहावा सामना आहे. तर दोन्ही संघ आयपीएलमधील आपला दूसरा सामना खेळणार आहेत. विराटच्या नेतृत्वाखालील बंगळुरु संघ पहिला सामना जिंकला आहे. बंगळुरुने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केले आहे. त्यामुळे विराटसेनेचं मनोबल चांगलंच वाढलं आहे. तर हैदराबादला कोलकाताकडून पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे पहिला विजय मिळवण्यासाठी हैदराबाद संघाची धडपड असणार आहे.
बंगळुरु विरुद्ध हैदराबाद सामना चेन्नईतील एमए चिदम्बरम स्टेडिअमध्ये होणार आहे. हे मैदान फिरकीपटूंसाठी चांगलं असल्याचं मानलं जातं. आतापर्यंत या मैदानावर तीन सामने झाले आहेत. त्यामुळे खेळपट्टी येत्या सामन्यात आणखी स्लो होत जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करणं योग्य असेल असं जाणकारांचं म्हणणं आहे. तर फिरकीपटूंची जादू चालली तर मात्र सामन्याचं चित्र पालटून जाईल.
IPL2021: रोहित शर्माला फिटनेसबाबत काय वाटतं?
बंगळुरुने पहिला सामना जिंकला असला तरी फलंदाजांच्या कामगिरीमुळे चिंता आहे. त्यामुळे हैदराबादविरुद्धच्या संघात काही बदल केले जातील. मागील पर्वात चांगली कामगिरी केलेला देवदत्त पडीक्कल आता फिट आहे. करोनावर मात करत तो संघात परतला आहे. त्यामुळे हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याला स्थान मिळण्याची शक्यता आहे.
IPL 2021: सूर्यकुमार यादवचा उत्तुंग षटकार पाहून हार्दिक पांड्या आश्चर्यचकित; पहा व्हिडीओ
पहिल्या सामन्यात हैदराबादची कामगिरी निराशाजनक राहिली. आघाडीच्या फलंदाजांसोबत वेगवान गोलंदाज चांगला कामगिरी करु शकले नाही. तर केन विलियमसन दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे. त्याचं या सामन्यात खेळणं अवघड आहे. त्यामुळे पहिल्या पराभवानंतरही संघात कोणताही बदल होणं कठीण आहे.
दोन्ही संघातील संभाव्य ११ खेळाडू
सनराइजर्स हैदराबाद: डेविन वॉर्नर (कर्णधार), वृद्धिमान साहा, जॉनी बेअरस्टो, मनिष पांडे, मोहम्मद नबी, विजय शंकर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, टी नटराजन, संदीप शर्मा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलिअर्स, रजत पाटीदार, वॉशिंगटन सुंदर, हर्षल पटेल, काइल जेमिसन, डॅनिअल ख्रिश्चियन, यजुवेंद्र चहल