आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी घोडदौड सुरुच आहे. राजस्थान विरुद्धचा सामना जिंकत बंगळुरुने विजयी चौकार मारला आहे. या सामन्यात विराट आणि देवदत्त पडिक्कल या जोडीनं राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. राजस्थाननं विजयासाठी दिलेलं १७८ धावांचं लक्ष्य सहज गाठलं. बंगळुरुने १७ व्या षटकातच हे आव्हान पूर्ण केलं. १० गडी राखून आणि २१ चेंडू शिल्लक ठेवून बंगळुरुने हा विजय मिळवला. देवदत्तनं ५२ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या. तर विराटने ४७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. राजस्थानच्या गोलंदाजांना ही जोडी फोडण्यात सपशेल अपयश आलं. या विजयासह आयपीएल गुणतालिकेत बंगळुरुचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. बंगळुरुने यापूर्वी पहिल्या सामन्यात मुंबईला, दुसऱ्या सामन्यात हैदराबादला आणि तिसऱ्या सामन्यात कोलकाताला पराभूत केलं आहे. या विजयासह बंगळुरुचे गुणतालिकेत ८ गुण झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा