राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून बाहेर गेला आहे. पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये बेन स्टोक्सला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली होती. बोटाला झालेली दुखापत गंभीर असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी स्टोक्स मायदेशी परतला आहे. शस्त्रक्रियेमुळे तो जवळपासू तीन महिने मैदानापासून लांब राहणार आहे. त्यामुळे बेन स्टोक्सला राजस्थान रॉयल्स संघाने भावूक निरोप देत लवकर बरा होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी दिवंगत वडिलांच्या नावाने त्याला जर्सी भेट देण्यात आली.
निरोपावेळी राजस्थान रॉयल्समधील खेळाडूंचं प्रेम बघून बेन स्टोक्स भावुक झाला. ‘इथून अशा पद्धतीनं जाणं खरंच दु:ख वाटतं. पण मी काहीच करू शकत नाही’, असे बेन स्टोक्स याने सांगितलं. तर राजस्थान रॉयल्सच्या टीमनं लवकर बरा हो आणि संघात परत ये असं भावनिक ट्वीट केलं आहे. या व्हिडिओत स्टोक्सनं टीमसोबत घालवलेले क्षण दाखवण्यात आले आहेत. नेटकरीही या व्हिडिओला गेट वेल सून अशा कमेंट्स देत आहेत.
Goodbyes are difficult.
Until next time, Stokesy. #RoyalsFamily | @benstokes38 pic.twitter.com/KRyNRrGuqQ
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 17, 2021
पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना बेन स्टोक्सच्या बोटाला गंभीर दुखापत झाली होती. ख्रिस गेलचा कॅच पकडताना बेन स्टोक्सला दुखापत झाली होती. याच सामन्यात त्याने गोलंदाजीही केली होती. एक षटक टाकत त्याने १२ धावा दिल्या होत्या. तर फलंदाजी करताना बेन स्टोक्स शून्यावर बाद झाला होता. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर शमीने त्याचा झेल पकडला होता.