IPL 2021 च्या यंदाच्या मोसमातल्या सातव्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स एकमेकांसमोर उभे ठाकले. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्याचं विशेष म्हणजे दोन्ही संघांचे कर्णधार हे पहिल्यांदाच आयपीएलमध्ये आपल्या टीमचं नेतृत्व करत आहेत. पहिल्या सामन्यात संजू सॅमसननं तडाखेबाज शतक झळकावलं होतं. मात्र, या सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वातल्या दिल्लीच्या संघानं चेन्नई सुपर किंग्जच्या बलाढ्य संघाला पराभूत करण्याची करामत करून दाखवली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचा आजपर्यंतचा सरासरी स्कोअर १८२ आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ ४ वेळा जिंकला असून दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ ५ वेळा जिंकला आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये दोन्ही संघांना बरोबरीची संधी असल्याचं मानलं जात आहे. पहिल्या डावाच्या शेवटी दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी १४८ धावांचं लक्ष्य ठेवलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा