शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या आयपीएल २०२१च्या ३२व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जवर २ धावांनी निसटता विजय मिळवला. पंजाबच्या एडम मार्कराम आणि निकोलस पूरन यांना शेवटच्या षटकात ४ धावांची गरज होती, पण राजस्थानचा गोलंदाज कार्तिक त्यागीने एकच धाव देत आणि दोन विकेट्स घेत सामना आपल्या बाजूने फिरवला. नाणेफेक गमावलेल्या संजू सॅमसनच्या संघाने प्रथम फलंदाजी करत एविन लुईस, यशस्वी जयस्वाल आणि महिपाल लोमरोर यांच्या योगदानाच्या जोरावर पंजाबला १८६ धावांचे आव्हान दिले. पंजाबकडून अर्शदीप सिंगने ३२ धावांत ५ बळी घेतले. प्रत्युत्तरात पंजाबचे सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी १२० धावांची दमदार सलामी दिली. मयंकने अर्धशतकी खेळी केली. शेवटच्या षटकात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर पंजाबला २० षटकात १८२ धावाच करता आल्या. त्यागीला सामनावीर पुरस्कार मिळाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा