आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नईचा ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने २७ चेंडूत ३२धावा करत ऑरेंज कॅप मिळवली आहे. आयपीएलमध्ये खेळल्या गेल्या १६ सामन्यात त्याने ६३५ धावा केल्या आहेत. या खेळीत १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने एकूण ६४ चौकार आणि २३ षटकार ठोकले आहेत. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवणारा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे.
कोलकाताविरुद्ध याच सामन्यात चेन्नईच्या फाफ ड्युप्लेसिसची ऑरेंज कॅप अवघ्या दोन धावांनी हुकली. फाफनं १६ सामन्यात ६३३ धावा केल्या आहेत. यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ९५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. फाफने एकूण ६० चौकार आणि २३ षटकार ठोकले आहेत. कोलकाताविरुध्द फाफने ५९ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. शेवटच्या चेंडूवर त्याने उत्तुंग फटका मारला. पण सीमेवर वेंकटेश अय्यर झेल घेतला आणि त्याचं ऑरेंज कॅपचं स्वप्न भंगलं.
- ऋतुराज गायकवाड- ६३५
- फाफ डुप्लेसिस- ६३३
- केएल राहुल- ६२६
- शिखर धवन- ५८७
- ग्लेन मॅक्सवेल- ५१३
- संजू सॅमसन- ४८४
- पृथ्वी शॉ- ४७९
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंह धोनी (कप्तान आणि यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेजलवूड.
कोलकाता नाइट रायडर्स – ईऑन मॉर्गन (कप्तान ), शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुनील नरिन, शाकिब अल हसन, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.