आयपीएल २०२१ स्पर्धेत चाहत्यांना अनेक रोमांचक प्रसंग पाहायला मिळाले आहेत. त्यापैकी काल झालेला चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या संघातील एक प्रसंग अशाच स्वरुपाचा होता. यात पंचाच्या एका निर्णयावर खूप टीका करण्यात आली. मैदानावरील पंच आणि तिसऱ्या पंचांचा एक विसंगत निर्णय कालच्या सामन्यात पाहायला मिळाला. तत्पूर्वी, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यातही पंचांच्या एका निर्णयाबाबत बराच गदारोळ झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काल सोमवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात घडलेल्या या घटनेवरून सुनील गावसकर यांनी टीव्ही अंपायरला फटकारले. सामन्याच्या शेवटच्या षटकात सीएसकेच्या ड्वेन ब्राव्होवर ६ धावांचा बचाव करण्याची जबाबदारी देण्यात आली. वेस्ट इंडिजच्या या गोलंदाजाने षटकाचा दुसरा चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर टाकला. वास्तविक, तो चेंडू खेळपट्टीवरही पडला नाही.

हेही वाचा – पाकिस्तानी चाहत्यांना ‘जबर’ धक्का! क्रिकेटपटू उमर अकमलनं सोडला देश; कारण…

चेंडू खेळपट्टीबाहेर पडल्याने लाईन अंपायरने नो बॉलचा इशारा दिला, पण तिसऱ्या अंपायरचा सल्ला मागितल्यानंतर निर्णय मागे घेण्यात आला. नियमानुसार, जर चेंडू पूर्णपणे किंवा अंशतः खेळपट्टीच्या बाहेर असेल तर पंच नो-बॉल देऊ शकतो. मैदानावरील पंचांचा कॉल बदलण्याच्या तिसऱ्या अंपायरच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. टीव्ही अंपायरने नो-बॉलऐवजी त्याला वाइड म्हणण्याचा निर्णय का घेतला हे गावसकरांना समजले नाही.

सामन्यानंतर गावसकर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले, “तो स्पष्टपणे नो बॉल होता. आम्ही टीव्ही पंचांकडून काही निर्णय बघितले आहेत, जे या परिस्थितीत विजय आणि पराभवात महत्त्वाचे ठरू शकतात. असे झाले नाही पाहिजे. अशा निर्णयांनी खेळ बदलू नये. बरे झाले दिल्लीने सामना जिंकला, कारण यामुळे खेळ बदलू शकला असता.”

हे षटक चाहत्यांसाठी मनोरंजक ठरले, ड्वेन ब्राव्होने तिसऱ्या चेंडूवर अक्षर पटेलला बाद करून सीएसकेला पुन्हा सामन्यात परत आणले. मात्र कगिसो रबाडाने चौथ्या चेंडूवर चौकार मारत दिल्लीला विजय मिळवून दिला.